पावसाचा जोर वाढला : घाटात दरड कोसळली !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २८ सप्टेंबर २०२३

राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे वैभववाडी तालुक्यात भुईबावडा घाटात काल दुपारी पावणे चारच्या सुमारास दरड कोसळली. त्यामुळे खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला असून आज दि.२८ ऑरेंज तर पुढील तीन दिवस यलो अलर्ट जाहीर केला आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. मंगळवारी (ता. २६) सावंतवाडी, वेंगुर्ले, वैभववाडी तालुक्यात जोरदार पाऊस झाला होता. त्यानंतर काल देखील दुपारनंतर जिल्ह्याच्या विविध भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. वैभववाडी तालुक्यात दुपारी एकनंतर मुसळधार पावसाला सुरूवात झाली. घाटपरिसरात पावसाचा जोर अधिक होता. मुसळधार पावसामुळे खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील भुईबावडा घाटात गगनबावड्यापासून दोन किलोमीटरवर दरड कोसळली. दगड, माती आणि झाडांचा मोठा भराव रस्त्यावर आल्यामुळे मार्गच बंद झाला. परिणामी वाहतूक ठप्प झाली. घाटरस्त्यात असलेली वाहने पुन्हा करूळ घाटमार्गे वळवावी लागली. घाटात दरड पडल्याची माहिती मिळताच बांधकाम विभागाचे शाखा अभियंता शुभम दुडये यांनी जेसीबी आणि कर्मचारी तत्काळ घटनास्थळी पाठविले.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम