आज आर्थिक व्यवहार सांभाळून करा ; वाचा राशिभविष्य !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २९ सप्टेंबर २०२३

मेष : आर्थिक फायदा संभवतो. मुलांमुळे आजची संध्याकाळ प्रसन्न राहील. तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल. स्पर्धेमुळे तुमचे कामाचे वेळापत्रक धकाधकीचे, धावपळीचे बनेल. तुमची संवाद कौशल्ये प्रभावी ठरू शकतील.

वृषभ  : नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरुप मिळेल. सुयोग्य असे निर्णय मिळतील आणि घरगुती तणाव सुकर करील. नवीन उपक्रम, उद्योग हा आकर्षक आणि योग्य परतावा मिळण्याबाबत आशादायी असेल. कुटुंबासोबत वेळ घालवाल.

मिथुन : आर्थिक हानी संभवते. थोड्या काळासाठीच्या प्रशिक्षण वर्गात आपले नाव नोंदवा, नवे तंत्रज्ञान शिकणे आणि आपले कौशल्य वाढविण्यास त्याचा फायदा होईल. तुम्ही तुमच्या जोडीदारावर आज भरपूर खर्च करणार आहात.

कर्क  : तुम्हाला एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याची इच्छा होईल. मनशांती लाभेल. महत्वाच्या वस्तूंची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी आज प्रेमाने भरलेले वातावरण राहील. तुमचे वैवाहिक आयुष्य खूप सुंदर आहे.

सिंह  : आर्तिक अडचणी दुर होतील. कुणीतरी तुम्हाला त्रास देण्यास कारणीभूत ठरेल. सुयोग्यरित्या मार्ग अवलंबावा. तुम्हाला काळजी घेणारा आणि समजूतदार मित्र भेटेल. किरकोळ आणि ठोक व्यापाऱ्यांसाठी चांगला दिवस. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे.

कन्या : अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. आर्थिक व्यवहार सांभाळून करा. नातेवाईकांच्या भेटीमुळे आजचा दिवस सुखद आणि अनोखा असेल. धर्मादाय आणि सामाजिक कामाचे तुम्हाला आकर्षण वाटू शकते.

तूळ : रिअल इस्टेट आणि आर्थिक व्यवहारांसाठी चांगला दिवस. मुलांच्या बक्षिस समारंभाचे आमंत्रण हा तुमच्यासाठी आनंदाचा मार्ग ठरु शकतो. स्वप्ने सत्यात उतरल्याची प्रचिती मिळेल. किरकोळ आणि ठोक व्यापाऱ्यांसाठी चांगला दिवस.

वृश्चिक : आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबियांसमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. आज तुमचे मन ऑफिसच्या कामामध्ये लागणार नाही. व्यस्त दिनचर्येचा व्यतिरिक्त ही आज तुम्ही आपल्यासाठी वेळ काढण्यात सक्षम व्हाल.

धनु : आर्थिक आघाडीवर सुधारणा. सहकुटूंब सामाजिक कार्य केल्याने प्रत्येकजण आनंद आणि निवांत राहील. समाधानकारक परिणामांसाठी सर्व कामचे नीट आयोजन करा. कार्यालयीन कामकाज मार्गी लावताना तुमच्यावर ताण तणावाचे मळभ असेल.

मकर : आजचा दिवस लाभदायक. मुलांनी त्यांच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रीत करण्याची आणि भविष्याची योग्य योजना करण्याची गरज. त्रयस्थ व्यक्तीचा हस्तक्षेप वैमनस्य निर्माण करू शकतो. तुमच्या बॉसचा मूड चांगला असल्यामुळे कामच्या ठिकाणी आज चांगल्या गोष्टी घडतील.

कुंभ : आर्थिक परिस्थिती सामान्य. व्यवस्थित संवाद साधून आणि सहकार्याने जोडीदाराशी संबंध सुधारतील. पर्यटन क्षेत्रात तुम्हाला करिअरच्या संधी आहेत. यश तुमची आतुरतेने वाट पाहात आहे. तुमच्या वैवाहिक आयुष्यात तुम्हाला आज थोडी मोकळीक हवी असेल.

मीन : गुंतवणूक करण्यापासून सावध राहा. जुन्या ओळखी आणि संबंधाना उजाळा देण्यासाठी चांगला दिवस. संयुक्त प्रकल्प आणि भागीदारीपासून दूर रहा. विद्यार्थी-विद्यार्थिनींना आजचे काम उद्यावर नाही टाकले पाहिजे. जोडीदारासमवेत व्यतीत केलेल्या जुन्या रोमँटिक दिवसांची आज पुन्हा एकदा उजळणी कराल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम