देशात सत्ताधारी दंगल घडविण्याच्या विचारात ; संजय राऊत !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २९ ऑगस्ट २०२३ | देशातील अनेक पक्ष आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी सज्ज झाले असून येत्या काळात राम मंदिराच्या उद्घाटनावेळी देशभरात दंगल घडवण्याच्या विचारात असल्याचा आरोप शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी केला. या प्रकरणी विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीत सल्लामसलत होणार असल्याचेही ते म्हणाले.

अयोध्येतील राम मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. जानेवारी 2024 पर्यंत या मंदिराचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे. जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी भाजप राम मंदिराच्या उद्घाटनावेळी मोठा हल्ला घडवू शकतो असा दावा केला आहे. संजय राऊत यांनी मंगळवारी त्यांचा हा दावा अत्यंत गंभीर असल्याचे नमूद करत या प्रकरणी विरोधी पक्ष सावध असल्याचे स्पष्ट केले. देशात अनेक प्रश्न आहेत. पण भाजप केवळ धार्मिक तेढ निर्माण करून निवडणुकांना सामोरे जाण्याचा एककलमी अजेंडा राबवत आहे. राम मंदिराच्या उद्घाटनावेळी देशाच्या कानाकोपऱ्यातून रेल्वे अयोध्येला बोलावून त्यापैकी एखाद्या रेल्वेवर हल्ला घडवला जाईल. त्यानंतर देशात धर्मांधतेचा आगडोंब उसळवला जाईल, अशी भीती सर्वच राजकीय पक्षांना वाटत आहे, असे संजय राऊत म्हणाले. या लोकांनी गोध्रा घडवल्याचे सांगितले जाते. पुलवामा हल्ल्यावर संशय व्यक्त केला जातो. त्यानुसार 2024 ची निवडणूक जिंकण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून असे प्रकार केले जाऊ शकतात. या मुद्यावर इंडियाच्या बैठकीत चर्चा होईल. जनतेलाही अशी भीती वाटत आहे. त्यामुळे आम्ही अत्यंत सावध आहोत, असे राऊत म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम