मंत्रीमंडळाचा विस्ताराला आला वेग ; मुख्यमंत्र्यांनी बोलविली बैठक !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २ जुलै २०२३ ।  राज्यातील सर्वच विरोधकांनी शिंदे व फडणवीस सरकारला मंत्रीमंडळ विस्तारावर धारेवर धरले होते. त्यावर आता राज्य सरकारने याच आठवड्यात मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असल्याची बैठक झाली असून राजकीय वर्तुळात हलचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात आमदारांची बैठक बोलावली आहे. त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात काल रात्री उशिरा बैठक पार पडली आहे. त्यामुळे मंत्रीमंडळ विस्तारच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्याचे दिसून येत आहे.

गेल्या वर्षभरापासुन रखडलेल्या मंत्रीमंडळ विस्ताराला आता मुहूर्त लागला आहे. या आठवड्यामध्ये मंत्रीमंडळ विस्ताराची शक्यता आहे. या दृष्टिकोनातून दोन्ही पक्षांनी हालचाली सुरू केल्या आहेत. एकीकडे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कोर कमिटीची तातडीची बैठक बोलावली आहे.

तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी आपल्या महत्वाच्या आमदारांची आणि महत्वाच्या मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कोणत्या मंत्र्याना स्थान दिलं जाणार आहे, तर कोणाला डच्चू मिळणार आणि डच्चू मिळालेल्या मंत्र्यांना कोणती महत्वाची जबाबदारी मिळणार यावरतीही चर्चा होण्याची शक्यता आहे. तर या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आधीच्या मंत्रिमंडळातील दोन्ही पक्षांच्या दोन दोन नेत्यांना डच्चू मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. साधारण 12 12 पदे दोन्ही पक्षांच्या वाट्याला येतील. तर यामध्ये राज्यमंत्रीपद आणि कॅबिनेट मंत्रिपद ही देखील कोणाला मिळतील हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम