लाखो लोकांच्या उपस्थिती होणार जळगावात पंडित प्रदीप मिश्रा यांची कथा !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १९ नोव्हेबर २०२३

देशभरात गेल्या काही वर्षापासून पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेची मोठी चर्चा सुरु असून या कार्यक्रमास देशातील अनेक राज्यातील भाविक त्यांच्या कथेसाठी मोठी गर्दी करीत असतात, हीच कथा आता जळगाव शहरात होत असल्याने मोठे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जळगाव तालुक्यातील वडनगरी येथील बड़े जटाधारी महादेव मंदिर ट्रस्टतर्फे ५ ते ११ डिसेंबरदरम्यान वडनगरी फाट्याजवळ ३०० एकर शेतात शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले. या कथेचे आयोजन भरत चौधरी, जगदीश चौधरी, तुषार चौधरी यांच्यासह पंचकोशीतील शिवभक्तांकडून करण्यात आले आहे.

या कथेच्या आयोजनासाठी आयोजन समितीकडून जोरदार तयारी सुरू असून, वडनगरी गावाच्या फाट्याजवळील ३०० एकरची जागा तयार करण्याचे काम जोरात सुरू आहे. आयोजन समितीकडून ३० हून अधिक उपसमित्या तयार करण्यात आल्या आहेत. राज्यभरासह इतर राज्यांमधून येणाऱ्या भाविकांची मोठी संख्या पाहता, भाविकांसाठी राहण्याची व जेवणाचीही व्यवस्था आयोजकांकडून केली जात आहे. यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू आहे. ५ ते ११ डिसेंबरदरम्यान दररोज दुपारी १ ते ४ वाजेदरम्यान शिवमहापुराण कथेचे वाचन केले जाणार आहे. ४ डिसेंबर रोजी कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांचे जळगाव शहरात आगमन होणार असून, ४ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता जळगाव रेल्वे स्टेशन ते वडनगरी फाट्याजवळील बड़े जटाधारी महादेव मंदिरापर्यंत प्रदीप मिश्रा यांची शोभायात्रा काढण्यात येणार असून, वा शोभायात्रेदरम्यान भाविकांची मोठी गर्दी होण्याचा अंदाज आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम