माजी मंत्री जैन यांचे राजकीय भाष्य : अनेक वर्षाची प्रगती थांबली !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १९ नोव्हेबर २०२३

राज्याचे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी आपल्या निवासस्थानी झालेल्या शनिवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री जैन यांनी अनेक भाष्य केल्यानंतर जळगाव शहराची राजकीय गणित बदलण्याचे देखील संकेत मिळाले आहे.

माजी मंत्री जैन म्हणाले कि, आजच्या जळगावच्या अवस्थेविषयी न बोललेले बरे अशी परिस्थिती आहे. पण त्यावर मी भाष्य करू इच्छित नाही. कोणीतरी पुढे येऊन नेतृत्व हाती घ्यावे आणि जळगावला सुरुवातीचे दिवस आणावेत, अशी भावना देखील त्यांनी व्यक्त केली. चांगल्या गोष्टी होण्यासाठी नेतृत्व, नियंत्रण आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक असते. त्यावेळी माझी टीम चांगली होती, आमच्याकडे व्हिजन होते. या सर्वांच्या मदतीने १५ ते २० वर्षे शहर विकासासाठी भरपूर काम केले. मात्र आता माझी पूर्वीची टीमही राहिलेली नाही, त्यामुळे मलाही रस राहिलेला नाही. माझी मुले मुंबई व दुबईत असतात. मुलगी मीनाक्षी जैन एसडी-सीडचे काम पाहते. त्यामुळे राजकारणाचा वारसा म्हणून म्हणाल तर पुढे कोणी असेल असे मला वाटत नाही असेही सुरेशदादा जैन म्हणाले. राज्याची सध्याची राजकीय अवस्था ही उत्साहवर्धक व चांगली नाही, असेही त्यांनी सांगितले.

एसडी-सीडमार्फत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद होती, त्यावेळी पत्रकारांनी जळगावची झालेली सध्याची अवस्था, संभाव्य नेतृत्व याविषयी प्रश्न विचारले. त्यावर बोलताना सुरेशदादा जैन म्हणाले, की जळगावकरांची व्यथा इतरांप्रमाणे मलाही दिसते. जळगावचा विकास १९८० मध्ये सुरू केला. मात्र, २००४ च्या नंतर आज जे जळगाव बघतो आहे त्यावर न बोललेले बरे. मी बोलूही इच्छित नाही. कोणीतरी पुढे यावे आणि या शहराला परत सुरुवातीचे दिवस आणावेत. मागच्या २० ते २५ वर्षांत प्रगती थांबली आहे, ती परत व्हावी, अशी अपेक्षाही सुरेशदादा जैन यांनी व्यक्त केली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम