अमरावतीत कॉंग्रेसचा गड ढासळला ; आ.कडू यांचा विजय !

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ जुलै २०२३ ।  देशातील प्रमुख विरोधी पक्ष म्हणून असलेल्या कॉंग्रेस पक्षाला आता राज्यातील अनेक भागात वाईट दिवस असतांना आता अमरावती जिल्ह्यात देखील त्यांचा गड असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा गड ढासळला आहे. यात बच्चू कडू यांचा मोठा विजय झाला असून, त्यांनी माजी मंत्री आ. यशोमती ठाकूर यांना जबरदस्त धक्का दिला आहे.

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी आमदार बच्चू कडू यांचा विजय झाला असून, हा विजय आमदार बच्चू कडू यांच्यासाठी खूप महत्वाचा म्हटला जात आहे. तर दुसरीकडे अभिजीत ढेपे उपाध्यक्ष पदी विजयी झाले आहेत. काँग्रेसचे संख्याबळ मोठ्या प्रमाणावर असतांनाही बच्चू कडू यांनी खेळी करून हा विजय मिळवला आहे. हा आमदार यशोमती ठाकूर व काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलु देशमुख यांच्यासाठी खूप मोठा धक्का मानला जात आहे. कारण अमरावती जिल्हा हा काँग्रेसचा गड समजला जातो. काँग्रेसची तीन मतं बच्चू कडू यांनी फोडली व विजय संपादित केला आहे. हि निवडणूक बच्चू कडू यांच्यासाठी खूप महत्वाची आणि तितकीच कठीण होती. विजय मिळाल्यानंतर हा विजय शेतकऱ्यांचा असून दडपशाहीच्या विरोधातला असल्याची प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम