माजी आ.हर्षवर्धन जाधवांना हृदयविकाराचा सौम्य धक्का !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ जुलै २०२३ ।  राज्यातील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे दिल्लीत नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी असतांना त्यांना हृदयविकाराचा सौम्य धक्का बसला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना लागलीच रुग्णालयात दाखल करण्यात देखील आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दिल्लीतल्या सरकारी निवासस्थानी माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे कामानिमित्त गेले होते. तिथेच त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना तात्काळ RML रुग्णालयात हलवलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम