सर्व्हेतून आले समोर : देशभरात केवळ ६ टक्के तरुणांना नोकरी !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १९ ऑगस्ट २०२३ | देशातील लाखो तरूण बेरोजगार असल्याच्या बातम्या नेहमीच येत आहे. पण सध्या एका सर्व्हेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. देशातील १५ ते ३४ वयोगटातील 36 टक्के युवक बेरोजगारी ही मोठी समस्या असल्याचे मानतात, तर 16 टक्के युवक गरिबी ही मोठी समस्या मानतात आणि 13 टक्के युवकांना महागाई ही मोठी समस्या वाटते. लोकनीती- सीएसडीएसने केलल्या ताज्या सर्वेक्षणात ही आकडेवारी समोर आली आहे. या महिन्याच्या सुरूवातीलाच त्यांचा अहवाल प्रकाशित करण्यात आला असून त्यानुसार देशातील केवळ 6 टक्के युवक भ्रष्टाचार ही मोठी समस्या असल्याचे म्हणत असून 4 टक्के युवकांच्या मते शिक्षण आणि वाढती लोकसंख्या हे देशापुढचे मोठे आव्हान आहे.

2016 मध्येही अशाच प्रकारचा सर्वे करण्यात आला होता. त्यावेळेची आणि आताची तुलना केली तर बेरोजगारीला समस्या मानणाऱ्या युवकांच्या टक्केवारीत आता 18 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. तसेच महागाईला मोठी समस्या मानणाऱ्यांच्या संख्येतही 7 टक्के वाढ झाली आहे. एका इंग्रजी माध्यमाने दिलेल्या बातमीनुसार देशातील 18 राज्यांतील 9316 युवकांना सर्वेक्षणात सहभागी करून घेण्यात आले होते. हे सगळेच युवक प्रामुख्याने मध्यम वर्गातील होते. यातील बहुतांश मुलांच्या मते बेरोजगारी हीच मोठी समस्या आहे. या युवकांपैकी 40 टक्के जणांनी पदवी आणि त्याही पुढचे शिक्षण घेतले होते. सर्वेक्षणातील एकूणच माहितीचा अभ्यास केला तर 42 टक्के पुरूष आणि 31 टक्के महिलांच्या मते बेरोजगारी हीच मोठी समस्या आहे.

सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 49 टक्के युवकांनी सांगितले की, ते कोणते न कोणते काम करतात. यातील 40 टक्के पूर्ण वेळ नोकरी करणारे तर 9 टक्के पार्ट टाइम काम करणारे होते. 16 टक्के युवक डॉक्‍टर किंवा अभियंत्याची नोकरी करणारे होते तर 23 टक्के स्वत:चा व्यवसाय करणारे होते. 15 टक्के युवक शेती करणारे तर 27 टक्के युवक अकुशल कामगार होते. सरकारी नोकरी असणाऱ्या युवकांची संख्या 6 टक्के होती.

कोणत्या क्षेत्रात काम करणे आवडते असे विचारल्यावर 16 टक्के युवकांनी आरोग्य क्षेत्राला तर त्या खालोखाल 14 टक्के जणांनी शिक्षण क्षेत्राला पसंती दर्शवली. सरकारी नोकरी की खासगी या प्रश्‍नाला पाच पैकी 3 जणांनी सरकारी नोकरी पसंत असल्याचे सांगितले तर चार जणांपैकी केवळ एकानेच स्वयंरोजगाराला प्राधान्य असल्याचे नमूद केले. असे असले तरी 2007 च्या तुलनेत आता स्वयंरोजगाराला प्राधान्य देणाऱ्या तरूणांची संख्या वाढली आहे. त्यावेळी 16 टक्के तरूणांनी स्वत:च्या व्यवसायाला प्राधान्य दिले होते ती आकडेवारी आता 27 टक्के झाली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम