सरकारमध्ये अंतर्गत नाराजी : सप्टेंबरमध्ये मुख्य खुर्ची बदलेल !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १९ ऑगस्ट २०२३ | राज्यातील शिंदे, फडणवीस व पवार यांच्या मंत्रिमंडळाची काल बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांची गोपनीय बैठक झाली. यावेळी कुणालाही आत येण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे सरकारमध्ये अंतर्गत नाराजी असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यापासून सरकारमध्ये नाराजीनाट्य वाढले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात नाराजी असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान काँग्रेसचे आमदार विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केला आहे. कधी पुण्याचे उपमुख्यमंत्री दांडी मारतात तर कधी नागपूरचे. तिन्ही कधी एकत्र येत नाहीत. दोन उपमुख्यमंत्री एकत्र आले तर मुख्यमंत्री येत नाहीत. त्यामुळे हा सगळा तमाशा महाराष्ट्राला दिसत आहे.

सत्तेच्या खुर्चीसाठी हे सर्व काही सुरू आहे. येणाऱ्या १५ ते २० दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये बदल होईल. यामध्ये मेन खुर्चीपासून बदलायला सुरु होईल. सप्टेंबरमध्ये मुख्य खुर्ची बदलेल हे ठासून सांगतोय, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. यावेळी वडेट्टीवार यांनी राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची देखील मागणी केली. “पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागणार आहे. पूर्वी ओल्या दुष्काळाची परिस्थिती दिसत होती. आता काही जिल्ह्यांमध्ये कोरडा दुष्काळ निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात ११ जिल्ह्यात कमी पाऊस आहे. पीक हातात येईल, अशी परिस्थिती नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारने लवकर मदत करावी”, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. विजय वडेट्टीवार म्हणाले, “जेव्हा २०१४ मध्ये नरेंद्र मोदी निवडून आले. तेव्हा त्यांनी हमीभावाचे आश्वासन दिले होते. मात्र शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाहीत. सरकारने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा.”

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम