तुम्ही भरलेल्या पेट्रोलवर इतका लागतोय टॅक्स !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ७ मे २०२३ ।  सध्या देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या दहावर्षा आधी ६० रुपये लिटर पेट्रोलचे दर आज थेट शभरी पार केली आहे. प्रत्येक व्यक्ती कुठल्याही पेट्रोल पंपावर गेल्यावर सहज 100, 200 किंवा 500-1000 चं पेट्रोल भरतो. सध्या मुंबईत 106.86 च्या आसपास पेट्रोलची किंमत आहे. या ही मूळ किंमत नसून त्यावर अनेक टॅक्स आणि चार्ज लागून ग्राहकांपर्यंत ही रक्कम येते.

कधी विचार केलाय का की सरकारला यातला नक्की किती कर जातो? गेल्या वर्षी मार्चमध्ये रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर देशातील इंधनाच्या दरात कमालीची वाढ झाली होती. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने देशातील तेल कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवावे लागले. तुम्हाला माहीत आहे का की एक लिटर पेट्रोलच्या किमतीत कराचा हिस्सा साधारण 50 टक्के असतो.

केंद्र आणि राज्य सरकार पेट्रोल आणि डिझेलवर कर घेतं खरंतर यातून सरकारच्या तिजोरीत पैसे येतात. देशातील प्रमुख तेल कंपन्या हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑईल आणि भारत पेट्रोलियम दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरवतात. पेट्रोल-डिझेल हे केंद्र आणि राज्य सरकारच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. सरकारी आकडेवारीनुसार, केंद्र आणि राज्य सरकारांनी 2022-23 च्या 9 महिन्यांत पेट्रोलियम उत्पादनांमधून 545,002 कोटी रुपये कमावले. सरकारांनी 2021-22 या आर्थिक वर्षात 774,425 कोटी रुपये, 2020-21 मध्ये 672,719 कोटी रुपये पेट्रोल डिझेलच्या किंमतीमधून कमावले आहेत. एक लिटर पेट्रोलवर केंद्र आणि राज्य सरकार तुमच्याकडून किती कर घेतं समजून घेऊया. 1 मे २०२३ रोजी दिल्लीत एक लिटर पेट्रोल भरण्यासाठी ९६.७२ रुपये खर्च केले. यामध्ये 35.61 रुपये तर कर जातो. त्यापैकी 19.90 रुपये केंद्र सरकारच्या तिजोरीत आणि 15.71 रुपये राज्य सरकारकडे जातात. याशिवाय एक लिटर पेट्रोलवर डीलरचे कमिशन 3.76 रुपये आहे. वाहतुकीसाठी 0.20 पैसे जोडले जातात.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम