राज्यातील या जिल्ह्याचे तापमान वाढले ‘अलर्ट’ जारी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १९ एप्रिल २०२३ ।  गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी मुंबई आयोजित एका कार्यक्रमात उष्माघाताने १३ भाविकांचा मृत्यू झाला. शिवाय राज्यभरातील तापमानात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे.

अलर्टमध्ये म्हटलं की, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या विभागांमध्ये काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती आहे. नागरिकांनी उन्हाची तीव्रता कमी होईपर्यंत शक्यतो बाहेर पडू नये. यानुसार, रायगड, ठाणे, रत्नागिरी, पुणे, सोलापूर, धारशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, धुळे, अमरावती, नागपूर, वर्धा चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात ४० अंश सेल्सियसच्या पुढे नोंदवले गेले आहे. त्यामुळे उन्हाची तीव्रता कमी होईपर्यंत घराबाहेर पडणे, शारिरीक कष्टाची कामे टाळावीत, असं आवाहन करण्यात आलं आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम