मुंबई आज होणार I.N.D.I.A आघाडीची तिसरी बैठक !
बातमीदार | ३१ ऑगस्ट २०२३ | देशात भारतीय जनता पार्टीला हरविण्यासाठी सर्वच विरोधकांनी एकत्र येत इंडिया नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्सची स्थापना केली असून आजपासून मुंबईत सुरू होत आहे. ही बैठक दोन दिवस (31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर) चालेल. या बैठकीला 28 पक्षांचे सुमारे 63 नेते उपस्थित राहणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
बैठकीत इंडिया आघाडीच्या लोगोचे अनावरण करण्यात येणार आहे. तसेच, समन्वयकाचीही घोषणा होऊ शकते. बैठकीत जागावाटपावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. कोणता पक्ष, कुठून, किती जागांवर निवडणूक लढवणार (सीट वाटप) हे ठरवणे सर्वात आव्हानात्मक असणार आहे.कारण आघीडीतील अनेक पक्ष अनेक राज्यांत एकमेकांच्या विरोधात आहेत. दरम्यान, इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी काँग्रेस नेते पीएल पुनिया यांनी आघाडीच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवाराबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. पुनिया म्हणाले, लोकसभा निवडणूकीत I.N.D.I.A. आघाडीचा विजय झाल्यानंतरच पंतप्रधानपदासाठी नाव निश्चित होईल. निवडून आलेले खासदारच पंतप्रधान निवडतील.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम