![](https://ebatmidar.com/wp-content/uploads/2023/07/Batmidar-4-22.jpg)
राज्यातील ‘या’ भागात पाच दिवस पावसाचा धोका कायम !
दै. बातमीदार । २३ जुलै २०२३ । देशातील अनेक राज्यात पावसाचा हाहाकार सुरु असून गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात पावसाने थैमान घातले असतांना मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. तर काही नद्यांनी पाण्याची धोकादायक पातळी ओलांडली आहे. रायगड,रत्नागीरी, सिंधुदुर्गमध्ये पुढचे पाचही दिवस अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर पालघर ठाण्यासाठी आजही ऑरेंज अलर्ट कामय आहे.
विदर्भासाठी पुढचे पाच दिवस पावसाचे मुसळधार पावसाचे आहेत. अमरावती, गडचिरोली, वाशिम आणि यवतमाळला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रात देखील आज धुव्वाधार पावसाचा अंदाज आहे. जळगाव साठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मराठवाड्यात देखील अनेक ठिकाणी विजांच्या कडकटांसह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुण्यातील घाट परिसरात आज अतिवृष्टीचा इशारा कायम असून कोल्हापूर तसेच साताऱ्यातील घाट माथ्यावर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज तर मुंबईसाठी आज यलो अलर्ट देण्यात आला आहे.
![Jain advt](https://ebatmidar.com/wp-content/uploads/2022/08/IMG_1987.jpg)
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम