ट्रेलरने दिली काळी पिवळीला जोरदार धडक ; ४ ठार तर ८ जखमी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १८ जुलै २०२३ ।  मुंबई-नाशिक महामार्गावर आज सकाळी  ट्रक आणि काळी पिवळीचा भीषण अपघात झाला आहे. खडवली फाट्याजवळ रस्ता क्रॉस करत असताना भरधाव वेगात येणाऱ्या ट्रेलरने काळी पिवळीला जोरदार धडक दिली आहे. अपघातस्थळी ग्रामस्थांनी धाव घेत मदत कार्य सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक आणि काळी पिवळीचा भीषण अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ८ जण जखमी झाले आहेत. ही घटना आज मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली आहे. अपघातानंतर स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी पडघा येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमींना खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  मुंबई-नाशिक महामार्गावरील खडवली फाट्याजवळ काळी पिवळी जीप प्रवाशांना घेऊन निघाली होती.

सकाळी ८ वाजेच्या सुमारास काळी पिवळी रस्ता क्रॉस करत असताना महामार्गावर भरधाव वेगात येणाऱ्या ट्रेलरने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, काळी पिवळी जीप सुमारे ६० फूट दूर फेकली गेली. या अपघातात ४ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर ८ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, या अपघाताचा पुढील तपास पडघा पोलिस करत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम