टोमॅटोचे भाव वाढल्याने बायको गेली नवऱ्याला सोडून !

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १३ जुलै २०२३ ।  देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढत असतांना त्यात आणखी टोमॅटोंच्या किंमती गगनाला भिडल्या असून बहुसंख्य घरात दैनंदीन जेवणातून टोमॅटो गायब झाला आहे. टोमॅटोच्या वाढलेल्या किंमतींमुळे एक बायको नवऱ्याला सोडून घरातून निघून गेली. ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील शाहदोल जिल्ह्यात घडली आहे.

संजीव बर्मन याचा टिफिन सर्व्हीसचा व्यवसाय आहे. त्याने घरी जेवण बनवत असताना 2 टोमॅटो वापरले होते. यावरून त्याचं आणि त्याच्या बायकोचं कडाक्याचं भांडण झालं होतं. न विचारता जेवणात 2 टोमॅटो वापरल्याने संजीवची बायको त्याच्यावर भडकली होती. भांडण सुरू असताना संजीवची बायको उठली आणि तिने त्यांच्या मुलीसह घरातून बाहेर पाऊल ठेवलं आणि ती परत आलीच नाही. संजीवने या दोघींना शोधायचा बराच प्रयत्न केला मात्र दोघी कुठेही सापडल्या नाहीत. यामुळे त्याने पोलिसांत धाव घेतली आणि बायकोने मुलीसह घर सोडलं असून दोघी सापडत नसल्याची तक्रार दिली. पोलिसांनी तक्रार दाखल केली असून त्यांनी शोधाशोध करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी सदर वृत्ताला दुजोरा दिला असून त्यांनी म्हटलं आहे की संजीवने भाजीमध्ये 2 टोमॅटो घातले होते, ज्यामुळे त्याची बायको भडकली होती. या रागाच्या भरात ती घर सोडून निघून गेली. पोलिसांनी संजीवना त्याची बायको आणि मुलगी शोधून देऊ आणि तुझ्या घरी आणून सोडू असं आश्वासन दिलं आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम