“तासखेड्याच्या महिलांनी दारूबंदी साठी कसली कंबर सावदा पो .स्टे. ला आक्रोश मोर्चा
सावदा. ता.रावेर येथे बऱ्याच वर्षापासून महिला वर्ग गावातील जोमात सुरू असलेल्याअवैध दारू विक्री च्या त्रासाला कंटाळून त्यांच्या होणाऱ्या संसाराच्या राख रांगोळी मुळे त्रस्त झालेल्या आहेत.
याबाबत तासखेड्याच्या महिलांनी एकत्र होऊन ग्रां पं सदस्य विनोद कोळी यांना घेऊन त्यांच्या मध्यस्थीने सावदा येथे नव्याने रुजु झालेले सहाय्यक पोलीस निरिक्षक विशाल पाटील यांना दि. ४ जुलै रोजी आक्रोश मार्चा काढून निवेदन देण्यात आले . सदयस्थिती महिलांनी रडत रडत मांडली आम्हाला न्याय दया ,गावातील अवैध दारूविक्री बंद करून आम्हाला आमच्या मुलाबाळाना सुखाचा घास खाऊ दया, दारूमुळे आमचे कुटूंब उघडल्यावर पडले असून आमच्या संसाराची राख रांगोळी होण्या पासुन वाचवा असे महिलांनी उपस्थित असलेल्या एपीआय विशाल पाटील यांच्या जवळ समस्या मांडल्या.
त्यावेळेस निवेदन देण्यात आले . निवेदनात दिव्या कोळी सुपडाबाई कोळी आशा गोसावी कविता कुंभार जिजाबाई पाटील शारदा पाटील रेखा विनोद तायडे भावना पाटील माया पाटील जनाबाई पाटील चंदा कोळी संजना कोळी .रेखा बाम्हंदे योगीता कोळी संजीवनी कोळी शोभा कोळी ललीता कोळी सोनाली तायडे जागृती कोळी निर्मला कोळी शोभाबाई पाटील माधूरी बाम्हंदे नंदाबाई पाटील रेतना इंगळे करीष्मा इंगळे कविता बाम्हदे यांची नावे आहेत.
नव्याने रुजू झालेले एपीआय विशाल पाटील व दारु शुल्क अधिकारी यांनी कायम स्वरूपी दारू बंदी करतील का? महिलाना न्याय देतील का?याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागलेले आहे .
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम