सोशल मिडीयावर फोटो टाकून चाहत्यांना दिले ‘या’ गायकने सुखद धक्का !
बातमीदार | २८ ऑगस्ट २०२३ | अभिनेत्यासह अभिनेत्री नेहमीच सोशल मिडीयावर सक्रीय असतात. त्यामुळे त्यांचे चाहते देखील त्यांच्या प्रत्येक फोटोला भरभरून प्रतिसाद देखील देत असतात. नुकतेच एका गायकने सोमवारी सकाळी त्याच्या सोशल मीडिया हँडलवर एक आनंददायक बातमी शेअर केली. तो गायक म्हणजे अरमान याने त्याची लॉंग टर्म गर्लफ्रेंड आशना श्रॉफसोबत साखरपुडा करुन त्याचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केलेत.
https://twitter.com/ArmaanMalik22/status/1696047868132704412/photo/1?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1696047868132704412%7Ctwgr%5Ead2595bfb6cf1cff451a20c1785821621bd93bc4%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.esakal.com%2Fmanoranjan%2Fsinger-armaan-malik-engagement-with-girlfriend-aashna-shroff-pics-viral-drj96
अरमानने साखरपुड्याचे फोटो शेअर करुन लिहिले, “आणि आमच्या सहजीवनाची सुरुवात झालीय”. पहिल्या फोटोत, ऑफ-व्हाइट सूट घातलेला अरमान एका गुडघ्यावर खाली जाऊन आशनाच्या बोटात अंगठी घालताना दिसत आहे. दुसरीकडे, आशनाच्या चेहऱ्यावर साखरपुड्याच्या आनंद झळकत होता . ती पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अत्यंत सुंदर दिसतेय.
आशना श्रॉफ एक भारतीय फॅशन, सौंदर्य ब्लॉगर आणि YouTuber आहे. तिला कॉस्मोपॉलिटन लक्झरी फॅशन इन्फ्लुएंसर ऑफ द इयर 2023 (भारत) म्हणून गौरविण्यात आले. अरमान मलिक, एक भारतीय गायक, गीतकार, रेकॉर्डीस्ट, व्हॉईस-ओव्हर आर्टिस्ट, परफॉर्मर आणि अभिनेता आहे. त्याने विविध भाषांमध्ये सुंदर गाणी गायली आहेत. अरमानने केवळ हिंदीच नाही तर तेलगू, इंग्रजी, बंगाली, कन्नड, मराठी, तमिळ, गुजराती, पंजाबी, उर्दू आणि मल्याळम अशा भाषांमध्ये श्रवणीय गाणी गायली आहेत
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम