आरक्षणासाठी तरुणाने पेटवले अन मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात आईदेखील गंभीर !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २३ नोव्हेबर २०२३

राज्यात मराठा आरक्षणाचा लढा तीव्र होत असतांना अनेक तरुण आणि तरुणीनी आपली जीवनयात्रा संपविल्याच्या घटना घडत असतांना नुकतेच जालना जिल्ह्यातील अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. मराठा आरक्षणासाठी सरकार काही निर्णय घेत नसल्याचे म्हणत अंगावर पेट्रोल टाकून १८ वर्षीय तरुणाने पेटवून घेतल्याची घटना बुधवारी सकाळी पाथरवाला बुद्रूक येथे घडली. मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात आईदेखील गंभीररीत्या भाजली. दोघांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगल गणेश जाधव आणि सुरज गणेश जाधव असे भाजलेल्या आई आणि मुलाचे नाव आहे. मंगल जाधव या ३५ टक्के भाजल्या असून, सूरज ६० टक्के भाजला आहे, अशी माहिती घाटी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे यांनी दिली. मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात वडील गणेश जाधव यांचे कपडे जळाले. सरकारने आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावून या दोघांवर खासगी रुग्णालयात उपचाराची सोय करावी, अशी मागणी सूरजचे मामा मुरलीधर खरात यांनी केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम