तोडफोड करणे भोवले : अडीच हजारावर आंदोलनकर्त्यांवर गुन्हा !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २३ नोव्हेबर २०२३

राज्यात मराठा व धनगर समाज आपल्या आरक्षणासाठी आक्रमक झाला असून नुकतेच जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर अनुसूचित जमाती आरक्षणाची (एसटी) अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी धनगर समाजाबांधवांकडून शहरात मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मोर्चाच्या ठिकाणी अधिकारी न आल्याने संतप्त मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक केली. तोडफोड केल्याप्रकरणी ३६ जणांसह दोन ते अडीच हजार आंदोलनकर्त्यांवर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले सभेनंतर समाजबांधवांचे जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारायला यावे, अशी मागणी मोर्चेकऱ्यांकडून करण्यात आली. मात्र, जिल्हाधिकारी न आल्याने संतप्त जमावाने जिल्हाधिकारी कार्यालयाचे लोखंडी गेट तोडले. आंदोलनकर्त्यांनी कार्यालयावर दगडफेक केली. चारचाकी, दुचाकींची तोडफोड केली. या प्रकरणात सहायक पोलिस निरीक्षक संदीप सावळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम