ग्रामीण रुग्णालयातील अनागोंदी कारभारा विरुद्ध युवकांनी रुग्णालय अधीक्षकांना धरले धारेवर

बातमी शेअर करा...

भडगाव/प्रतिनिधी

ग्रामीण रुग्णालयातील अनागोंदी कारभारा विरुद्ध शहरातील युवकांनी एकत्र येऊन रुग्णालय अधीक्षकांना धारेवर धरले आणि सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनचा इशारा देत निवेदन देण्यात आले.
भडगाव ग्रामीण रूग्णालय येथे पुर्णवेळ डाक्टर नाहीत तसेच वैद्यकीय अधिकारी यांचे सहकार्य लाभत नाही सदर दवाखान्यात डिलेवरी साठी पेशंट नेले असता डॉक्टरांनी पाहिजे तशी सुविधा उपलब्ध करून दिली नाही सदर दवाखान्यातील तज्ञ व सिजर डिलिव्हरी करणारे डॉक्टर उपलब्ध नसल्याकारणाने पेशंटला तुम्ही जळगाव घेऊन जा असे सांगितले परंतु सदरील पेशंट त्या परिस्थितीत नसल्याकारणाने सदर पेशंटला जळगाव नेने अशक्य होते त्यामुळे नाईलाज असतो सदर पेशंटला खाजगी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करावे लागले वास्तविक सदर पेशंटला दवाखान्यात नेण्याचे तीन दिवसांपूर्वीच सदर डॉक्टरांनी तुम्ही केलेल्या पेशंटला दवाखान्यात आणा आम्ही सिजर करून देऊ असे सांगितले होते परंतु सदर पेशंटला दवाखान्यात नेले असता सदर सिजर डिलिव्हरी करणारे डॉक्टर त्यांचे वैद्यकीय कामासाठी बाहेरगावी गेले आहेत असे सांगण्यात आले अशा प्रकारे सदरील दवाखान्यात डॉक्टर उपलब्ध राहत नसल्याने गोरगरिबांची अतोनात हाल होत आहेत दुर्लक्ष होत आहे वेळे प्रसंगी नागरिकांचे जीव जातात असा प्रकार सतत भडगाव ग्रामीण रुग्णालयात चालू आहे तरी आपण योग्य ती कारवी लवकरात लवकर करावी व निस्वार्थ डॉक्टरांची नियुक्ती करावी अन्यथा भडगाव तालुक्यातील नागरिकांकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल व त्याचे होणारे परिणाम आपण सर्वस्वी जबाबदार राहाल याची नोंद घ्यावी.
सदरील निवेदन देते वेळी मुन्ना परदेशी, मनोहर चौधरी, माधव राजपुत, सागर महाजन राहुल देशमुख, सचिन पवार, किरण शिंपी, विश्वनाथ भोई, सुनील भोई विशाल चौधरी,सौरभ देशमुख, राहूल महाजन, कुणाल पाटील, निखिल कासार, नितेश पाटील, सुमित जाधव, खुशाल पाटील, लाला परदेशी, राहूल सोनार, प्रशांत महाजन, सागर पाटील,आकाश महाले, किरण देसले, दादु पाटील उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम