चाळीसगावातील तरुणांनी माजविली सोशल मिडीयावर दहशत !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १९ जुलै २०२३ ।  चाळीसगाव शहरात तलवार, कट्टा,पिस्तूलासह फोटो काढून ते फोटो सोशल मीडियावर प्रसारीत करुन समाजात दहशत निर्माण केल्याप्रकरणी पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळील दोन तलवार, एक चॉपर पोलिसांनी जप्त केला आहे. सोमवारी शहर पोलिस ठाण्याचे आशुतोष सोनवणे, रवींद्र बच्छे यांना गोपनीय खबर मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील यासीन नगर भागात काही मुले हातात तलवार व चॉपर घेऊन दहशत माजवत आहेत. तसेच हत्यारासह फोटो काढून सोशल मीडियावर प्रसारीत करीत आहेत, अशी माहिती समजली. यावरून पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक सुहास आव्हाड व त्यांच्यासोबत पोलिस नाईक राहुल सोनवणे, महेद्र पाटील, भूषण पाटील, आशुतोष सोनवणे, रवींद्र बच्छे, समाधान पाटील, विजय पाटील, राकेश महाजन, पवन पाटील यांच्या पथकाने संशयित मोईन अशपाक खाटीक (१९) नाजीम नजमुद्दीन खाटीक (१९), तबरेज तौकीर खाटीक (२४) व अन्य एक (सबस्टेशन जवळ, यासीन नगर, हिरापूररोड, चाळीसगाव), आयान दयान खाटीक ( २०, त्रिमूर्ती बेकरीच्या समोर, हुडको कॉलनी) यांना अटक केली. या पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम