…तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही ; संजय राऊत !
बातमीदार | २ नोव्हेबर २०२३
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आज नववा दिवस सुरु असून नुकतेच सर्व पक्षीय नेत्यांची देखील बैठक झाली यावेळी सर्वांचे एकमत झाले असतांना कुठलाही निर्णय अद्याप झालेला नसल्याने आता ठाकरे गटाचे नेते खा.संजय राऊत यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
खा.राऊत म्हणाले कि, कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यावे. मराठ्यांना आरक्षण देणे हे केंद्र सरकारच्याच हातात आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारात गुंतलेत आणि महाराष्ट्र पेटलेला आहे.जरांगे पाटलांचे प्राण पणाला लागले आहेत. त्यांना काही झालं तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे.
‘जरांगेंना काही झालं तर, महाराष्ट्र पेटेल आणि त्यांना महाराष्ट्र पेटवायचाय का? त्यासाठीच हे सगळं चाललंय का?’, असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केलाय. पंतप्रधानांनी मनोज जरांगे पाटलांशी किमान फोनवरून तरी संवाद साधलापाहिजे. ते एक एक तास मन की बातमध्ये बोलतात, पण महाराष्ट्रातील जरांगे पाटलांशी संवाद साधायला त्यांना अजिबात वेळ नाही, अशी टीका देखील संजय राऊतांनी केली आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम