…तर घरात बसेल ; राज ठाकरे बोलून गेले !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १३ जुलै २०२३ ।  राज्याच्या राजकारणात सुरु असलेल्या घडामोडी पाहता शरद पवारांसह उद्धव ठाकरे व आता राज ठाकरे पक्ष बांधणीसाठी राज्याच्या दौऱ्यावर बाहेर पडले आहे. त्यांनी आजपासून कोकण दौऱ्याला सुरुवात केली असून आज चिपळूणमध्ये त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

येत्या पंधरा दिवसांमध्ये राज ठाकरे पक्षाचा मेळावा घेणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी आज चिपळूणमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ते म्हणाले की, राज्यामध्ये जो व्यभिचार सुरु आहे तो मी कधीही करणार नाही. तडजोड करावी लागली तर घरात बसेन परंतु तडजोड करणार नाही. कार्यकर्त्यांनी मनाने एकत्र येऊन काम करणं आवश्यक असल्याचं राज यांनी सांगितलं. राज ठाकरेंनी आजपासून कोकण दौऱ्याला सुरुवात केली असून चिपळूणमधील पदाधिकाऱ्यांच्या दौऱ्यानंतर ते पुढे खेड, दापोलीकडे रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत मनसेचे वरिष्ठ पदाधिकारी अविनाश जाधव, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई यांची उपस्थिती आहे.

पदाधिकाऱ्ऱ्यांशी संवाद साधतांना राज ठाकरे म्हणाले की, पक्ष सांगेल ते काम करावं लागेल अन्यथा पदावर राहता येणार नाही. आपण आपला विचार पोहोचवण्याची आवश्यकता असून पदाधिकाऱ्यांनी पदांनी एकमेकांशी बोलण्याऐवजी मनांनी एकमेकांशी बोलणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले. दरम्यान, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्रपणे महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केलेली आहे. सत्तापक्षाच्या वतीने शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं प्रत्येक जिल्ह्यात आयोजन केलं जात आहे. एकूणच २०२४ लोकसभा, विधानसभा आणि संभाव्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वांचीच पक्षबांधणी जोमात सुरु असल्याचं दिसून येतंय.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम