…तर त्यांनी देखील घेतली असती शपथ ; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा गौप्यस्फोट

बातमी शेअर करा...

बातमीदार | २७ ऑक्टोबर २०२३

शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून अजित पवार यांच्यासह काही आमदार बाहेर पडल्यावर राष्ट्रवादीत मोठी फुट पडली त्यानंतर हसन मुश्रीफ देखील अजित पवार यांच्या गटात आल्यानंतर मोठी राजकीय खळबळ उडाली होती. पण आता याच नेत्याने गौप्यस्फोट केल्याने ते चर्चेत आले आहे.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादीचा शरद पवारगट आणि अजित पवारगट पुन्हा चर्चेत आले आहेत. एकेकाळचे सोबती आणि शरद पवारांच्या दोन्ही बाजूला हक्काने बसणारे जयंत पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यात असं नेमकं काय घडले आहे ? राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हसन मुश्रीफ आणि जयंत पाटील यांचा अनेक वर्ष सन्मान ठेवत, आपल्या पक्षामध्ये योग्य स्थान ही दिले आहे. आता राष्ट्रवादीत फूट पडली आहे आणि शरद पवार यांच्यासोबत जयंत पाटील तर अजित पवार यांच्यासोबत हसन मुश्रीफ यांनी जाणं पसंत केलं. सुरुवातीला एकमेकांवर टीका टिपणी करण्याचं या दोन्ही दिग्गज नेत्यांनी टाळलं होतं. मात्र आता थेट नाव घेऊन एकमेकाची गुपितं बाहेर काढण्याची भाषा करत आहेत.

हसन मुश्रीफ आणि जयंत पाटील या दोघांचीही ईडीने चौकशी लावलेली आहे. ईडी चौकशी सुरू झाल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी अजित पवार यांच्या बरोबरीने भाजप सोबत जाणे पसंत केलं. जयंत पाटील आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांची सध्या ईडी चौकशी सुरू आहे.गलीतल्या एका इलेक्ट्रिक व्यवसायात असणाऱ्या व्यापाऱ्याने साधारण दोन हजार कोटी रुपयांचा जीएसटी चुकवलेला आहे. या व्यापाऱ्यांचे आणि जयंत पाटलांचे अंतर्गत संबंध असल्याच्या चर्चा आहेत. यापूर्वी जयंत पाटलांनी या व्यापाऱ्याला आपण ओळखत नसल्याचे सांगितले आहे. मात्र तरीही या संदर्भात राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

शरद पवार यांच्या जवळ राहून अजित पवारांपेक्षाही मोठे स्थान मिळवण्याचा जयंत पाटलांचा नेहमीच प्रयत्न होते त्यातून जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात अंतर्गत मतभेद होते . तर अजित पवार यांच्या आधी भाजपसोबत जाण्याची जयंत पाटील यांची इच्छा होती मात्र, परिस्थितीनुसार त्यांनी हे निर्णय बदलले असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे कदाचित हसन मुश्रीफ यांनी याचाच आधार घेत जयंत पाटील यांच्या संदर्भात हा गौप्यस्फोट केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता जयंत पाटील हसन मुश्रीफ यांनी केलेल्या टीकेला काय उत्तर देतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम