
उन्हाळ्यात या भांड्यात पाणी पिल्यास होणार अनेक फायदे !
दै. बातमीदार । २५ एप्रिल २०२३ । उन्हाळ्यात अनेकांना वेगवेगळ्या आजाराशी दोन हात करावे लागत असतात. त्या आजाराचे देखील कारण असेच काही असते जे आपण आपल्या आहारात जर काही मोठा बदल झाल्यास याची सुरुवात होत असते. त्यातच एक म्हणजे तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. मात्र उन्हाळ्यातच तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यावे की नाही. याबद्दल लोकांच्या मनात संभ्रम असतो. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की उन्हाळ्यात कोणत्या लोकांनी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिऊ नये.
पचन सुधारते : तांब्यामध्ये हानिकारक जीवाणू नष्ट करणारे आणि पोटातील जळजळ कमी करणारे गुणधर्म आहेत, ज्यामुळे अपचन आणि संक्रमणासारख्या समस्या टळतात. तांबे पोट स्वच्छ आणि डिटॉक्स करण्यास, यकृत आणि मूत्रपिंडाचे कार्य नियंत्रित करण्यास देखील मदत करते.
वजन कमी होण्यास मदत : लवकर वजन कमी करण्यासाठी तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी नियमित प्यावे. पाचन तंत्र सुधारण्याव्यतिरिक्त तांबे तुमच्या शरीरातील चरबी काढून टाकण्यास देखील मदत करते. ज्यामुळे वजन जलद कमी होते.
जखमा बऱ्या करते : तांब्यामध्ये भरपूर अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. तांबे जखमा जलद बरे करण्याचा उत्कृष्ट स्रोत आहे. याव्यतिरिक्त तांबे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून नवीन पेशींच्या निर्मितीमध्ये मदत करते.
अशक्तपणा दूर करते : तांबे आपल्या शरीरातील बहुतेक प्रक्रियांसाठी महत्वाचे आहे. पेशींच्या निर्मितीपासून ते अशक्तपणापर्यंतची कमतरता दूर करण्यासाठी तांबे प्रभावी आहे.
काही लोकांनी उन्हाळ्यात तांब्याच्या भांड्यातील पाणी पिऊ नये. उन्हाळ्यात दिवसभर तांब्याच्या भांड्यात साठवलेले पाणी पिणे सुरक्षित नाही. ज्यांना पोटात अल्सरचा त्रास आहे, त्यांनी हे पाणी पिऊ नये. तुम्हाला किडनी किंवा हृदयाचा त्रास होत असेल, तर हे पाणी पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. अॅसिडिटीचा त्रास असलेल्या रुग्णांनी चुकूनही तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिऊ नये. कारण यामुळे समस्या वाढू शकते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम