राष्ट्रवादीत दोन गट नाहीच ; शरद पवारांचे स्पष्टीकरण !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ७ ऑगस्ट २०२३ | राज्यातील एकनाथ शिंदे व फडणवीस यांच्या सोबत अजित पवारांनी सत्तेत सहभागी झाल्यावर राष्ट्रवादी पक्ष आमचाच असा दावा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. हे सर्वश्रूत आहे. पण पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मात्र आपल्या पक्षात कोणताही गट अन् वाद नसल्याचे स्पष्ट केले आहे. निवडणूक आयोगाच्या नोटीसीला दिलेल्या स्पष्टीकरणात त्यांनी हा दावा केला आहे. त्यांच्या दाव्यामुळे निवडणूक विश्लेषकांच्या भुवया उंचावल्यात.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने नुकतेच निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवले होते. त्यात राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी अजित पवार यांची निवड करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. या पत्रावर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला पत्र पाठवून आपली बाजू स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, पवारांनी पाठवलेल्या आपल्या उत्तरात आपल्या पक्षात कोणतेही गटतट नसल्याचा दावा केला आहे. शरद पवारांच्या गटाने निवडणूक आयोगापुढे म्हटले आहे की, अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर दावा ठोकणे अकाली व दुर्दैवी आहे. ही मागणी आयोगाने फेटाळली पाहिजे. यासाठी या गटाने पक्षात कोणतेही गटतट नसल्याचा तर्क मांडला आहे.

शरद पवार गटाने काय केला युक्तिवाद?
अजित पवार यांच्या याचिकेतून राष्ट्रवादीत 2 उभे गट पडल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. राष्ट्रवादीत कोणता वाद आहे हे सिद्ध करण्यास अजित पवार सकृतदर्शनी सक्षम नाहीत. प्रथम दर्शनी निवडणूक आयोगानेही राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षात व अजित पवार यांच्या गटात वाद असल्याचे सिद्ध केले नाही. एवढेच नाही तर 1 जुलै 2023 पूर्वी अजित पवारांनी शरद पवार अथवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविरोधात कोणतीही तक्रार केली नव्हती. तसेच शरद पवार किंवा पक्षाच्या अन्य कोणत्याही नेत्यांच्या बैठकीत त्यांनी विरोधही केला नव्हता, अशी बाब शरद पवार यांच्या गटाने निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम