अभिनेता सनी देओल पोहचला सीमेवर आला असा अनुभव !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ७ ऑगस्ट २०२३ | गेल्या काही वर्षापूर्वी गदर सिनेमाच्या माध्यमातून सनी देओल मोठ्या चर्चेत आला होता. त्यानंतर त्याचे डायलॉगसुद्धा सोशल मिडीयावर आज देखील धुमाकूळ घालत असतात. पण सध्या अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा ‘गदर 2’ चित्रपट येत्या 11 ऑगस्ट प्रदर्शित होणार आहे. ‘गदर 2’ च्या निमित्ताने सनी- अमिषा आणि गायक उदीत नारायण अटारी- वाघा बॉर्डरवरील रिट्रीट सेरेमनीला उपस्थित राहिले. त्यांना पाहण्यासाठी हिंदुस्थानी- पाकिस्तानी चाहत्यांनी गर्दी केली.

यावेळी सनी देओल ‘गदर’ मधील तारा सिंहच्या तर अमिषा पटेल सकीनाच्या वेशभूषेत होती. यावेळी उदीत नारायण यांनी ‘घर आजा परदेशी’ हे गीत गायले. त्यावर सनी- अमिषाने ठेका धरला. त्यानंतर सनीने बीएसएफ जवानांचीही भेट घेतली. तसेच रविवारी लोंगोवाला येथे जाऊन माता तनोत देवीचे दर्शन घेतले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम