जगात पंतप्रधान मोदींच्या तोडीला एकही नेता नाही ; फडणवीस !
देशात २०१९ मध्ये सुरु झालेल्या कोरोनावर लस तयार करणे भारतासाठी मोठे यश आहे. लस घेण्यासाठी भारतीय नागरिकांना एक रुपयाही द्यावा लागला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राला भरभरून दिले आहे. सध्या चार लाख कोटींची कामे महाराष्ट्र सुरू असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तोडीचा एकही नेता सध्या जगात नाही, असा दावा देखील त्यांनी केला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावरही त्यांनी टीका केली. राहुल गांधी परदेशात जाऊन देशाची बदनामी करत असल्याचे ते म्हणाले. मात्र, राहुल गांधी यांना अमेरिकेच्या वाईट हाऊसनेच प्रत्युत्तर दिले असल्याचे देखील ते म्हणाले.
गंगापूर तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या 1075 कोटी रुपयांच्या ‘हर घर नल’ योजनेच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गंगापूर शहरात आले होते. गंगापूर तालुक्यातील 209 गावांसह त्या गावांमधील वाड्या, वस्त्यांवर डिसेंबर 2023 अखेरपर्यंत प्रत्येक घरात नळ देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या योजनेचा शुभारंभा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. महिलांनो एसटी महामंडळात तुम्हाला अर्धे टिकीट आहे, त्यामुळे बाहेरचे काम करायला आता तुम्ही जात जा, असा सल्ला देखील त्यांनी दिला. सर्वसामान्य महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टीने राज्य सरकार कटीबद्ध असल्याचे ते म्हणाले.
आवास योजनेमध्ये ओबीसी समाजाचा समावेश नव्हता, त्यामुळे ओबीसी समाज या संदर्भात सातत्याने मागणी करत होता. त्यामुळेच ओबीसी समाजाला न्याय देण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने मोदी घरकुल योजना सुरू केली. या माध्यमातून ओबीसी समाजाला त्यांच्या हक्काचे घर देण्याचे काम आमच्या सरकारने केले असल्याचे ते म्हणाले. पश्चिम वाहिनी नद्यांचे वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि तो आम्ही पूर्ण करणार असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. या माध्यमातून मराठवाड्याला त्यांच्या हक्काचे पाणी मिळणार असल्याचे देखील ते म्हणाले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम