ठाकरे – गांधी भेटीचा प्रोगाम नाहीच ; प्रदेशाध्यक्ष पटोले !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १४ एप्रिल २०२३ ।  राज्यातील महाविकास आघाडी व भाजप असे राजकारण सुरु असतांना उद्धव ठाकरे व राहुल गांधी यांची भेट होणार असल्याच्या चर्चा देखील सुरु झाल्या होत्या पण यावर आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी वक्तव्य केल्याने चित्र स्पष्ट झाले आहे.

सावरकरांच्या मुद्दयावरुन महाविकास आघाडीतील धूसफुस चव्हाट्यावर आली आहे. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा माफीवीर असा उल्लेख केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना खडे बोल सुनावले होते. त्यानंतर काँग्रेसकडूनही नाराजीचे सूर उमटल्याचे बोलण्यात येत होते. या पार्श्वभूमीवर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी राहुल गांधी लवकरच मातोश्रीवर येणार असल्याच्या चर्चा सर्वत्र सुरु आहेत. राहुल गांधी हे लवकरच मुंबईत येऊन उद्धव ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री निवासस्थानी भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे. सर्वात आधी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील सिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर लगेचच शरद पवार यांनी काल काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर विरोधी पक्षाची आघाडी मजबूत असून आम्ही भाजपविरोधात एकत्रितपणे लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

काय म्हणाले पटोले?

नाना पटोले म्हणाले, राहुल गांधी-उद्धव ठाकरे भेटीबाबत अजून काहीही ठरलेले नाही. पर्वा नितीश कुमार, तेजस्वी यादव राहुल गांधींना भेटले. त्यांनी अरविंद केजरीवाल यांची देखील भेट घेतली. काल राहुल गांधी आणि शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे यांची देखील भेट झाली. मात्र राहुल गांधी हे मुंबईत येणार असल्याचा कोणताही प्रोग्राम सध्या तरी नाही. याआधी देखील वेणुगोपालजी महाराष्ट्रात येणार असल्याचे आम्हाला माध्यमांकडून कळले होते. मात्र भाजपविरोधी दलांची मोट बांधण्याचे काम सुरु आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम