दुरुस्ती नाहीच पाटलांचे उपोषण सुरूच राहणार !
बातमीदार | १० सप्टेंबर २०२३ | महाराष्ट्रातील मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला सरसकट मराठा आणि कुणबी प्रमाणपत्र तत्काळ देण्याचे आदेश करावेत, ही आपली आग्रही मागणी आहे. परंतु, शासनाने नवीन जीआरमध्ये काही दुरुस्ती केलेली नाही. सरकारने मागणीनुसार बदल करून सुधारित जीआर दिला तर आपण उद्या, रविवारी सूर्य उगवण्यापूर्वी पाणी पिऊ. परंतु सध्या जीआरमध्ये बदल नसल्याने आपले उपोषण सुरू राहणार असल्याचे उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी जाहीर केले.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झाल्यानंतर शिष्टमंडळाने शनिवारी सकाळी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेला बदलांचा जीआर जरांगे यांना दिला. जीआरची पाहणी केल्यानंतर जरांगे बोलत होते. त्यावेळी जीआरमधून त्यांनी वंशावळीचा उल्लेख काढून सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत सुधारित जीआर काढण्याची मागणी सरकारपुढे मांडली.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम