मराठा समाजाला सरसकट आरक्षण नाहीच ; मुख्यमंत्री शिंदे !
बातमीदार | ९ नोव्हेबर २०२३
राज्यात मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केले होते पण दोन महिन्याचा अवधी दिल्यानंतर हे उपोषण तूर्त मागे घेतले असतांना राजय्त मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार, ही अफवा देखील पसरली आहे, यावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिल्या आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षेतेखाली बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. बैठकीत मराठा आणि ओबीसी आरक्षणावरुन सरकारमधीलच ओबीसी व मराठा मंत्री आमने-सामनेच आले. या मुद्द्यावरुन छगन भुजबळ आणि शंभुराज देसाई यांच्यात खडाजंगी झाल्याची माहिती आहे. यावेळी एकनाथ शिंदेंनी छगन भुजबळांची समजूत काढल्याचे समजते. बैठकीनंतर यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ओबीसी समाजाने मनामध्ये कोणताही संभ्रम ठेवू नये. मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याच्या अफवेमुळे त्यांच्यात संभ्रम निर्माण झाला होता. पण, तो आता दूर करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सरसकट मराठा समाजाला आरक्षण देण्यात येणार अशी अफवा पसरवण्यात आली किंवा तशी चर्चा करण्यात येत होती. त्यामुळे ओबीसी नेत्यांनी माझी भेट घेतली. छगन भुजबळ आणि ओबीसी नेत्यांच्या मनामधील शंका मी दूर केली आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम