चारचाकीच्या किमतीत झाला मोठा बदल ; जाणून घ्या काय आहे दर !
दै. बातमीदार । ३ एप्रिल २०२३ । देशातील अनेक तरुणांना दुचाकीसोबत चारचाकीची क्रेज निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक लोकांचा कल आता चारचाकी खरेदी करण्यासाठी असतो, त्याच लोकांसाठी हि बातमी महत्वाची आहे जे सध्या चारचाकी घेण्याचा विचार करीत आहेत. नवीन आर्थिक वर्ष सुरु होताच Maruti Suzuki ने ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. वास्तविक मारुती सुझुकीने आपल्या वाहनांच्या किमती 0.80 टक्क्यांनी वाढवल्या आहेत.
1 एप्रिल 2023 पासून ही दरवाढ लागू झाली आहे. यावेळी सर्व मॉडेल्सच्या किंमतींमध्ये 0.80 टक्क्यांनी वाढ होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. हे जाणून घ्या कि, मारुती ही सर्वात मोठ्या कार उत्पादकांपैकी एक आहे. याचे अनेक मॉडेल्स मध्यमवर्गीयांमध्ये खूपच लोकप्रिय आहेत.
23 मार्च रोजीच कंपनीकडून किंमती वाढवण्याबाबत संकेत देण्यात आले होते. यावेळी Maruti Suzuki ने सांगितले होते कि, खर्चावरील प्रभाव कमी करण्यासाठी कंपनीकडून एप्रिलमध्ये आपल्या वेगवेगळ्या मॉडेलच्या किंमती वाढवल्या जातील. आपला खर्च कमी करण्यासाठी कंपनी कडून शक्य ते सर्व प्रयत्नही केले जात आहेत.
2022-23 मध्ये Maruti Suzuki च्या विक्रीमध्ये 19 टक्क्यांची वाढ नंदवली गेली आहे. यादरम्यान कंपनीने 1966164 युनिट्सची विक्रमी विक्री केली आहे. 2021-22 मध्ये हाच आकडा 1652653 युनिट्स इतका होता. तसेच आताच संपलेल्या आर्थिक वर्षात Maruti Suzuki ने देशांतर्गत बाजारपेठेत 17,06,831 युनिट्सची विक्री केली आहे. जे की, 2021-22 मध्ये हा आकडा 14,14,277 युनिट्स इतका होता. जो की 21 टक्क्यांनी जास्त आहे. याआधीही टाटा मोटर्स, होंडा कार्स, हिरोमोटो कॉर्प यांसारख्या कंपन्यांकडूनही एप्रिलमध्ये किंमती वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.marutisuzuki.com/
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम