बसणार मोठा धक्का ; चार राज्यांत खाते उघडणेही अवघड !
बातमीदार | २ ऑगस्ट २०२३ | देशभरात आगामी होत असलेल्या निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी भाजप मोठा प्लान आखत अआहे. असाच एक कौल काही माध्यमांनी घेतला असून तो भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएच्या दृष्टीने निराशाजनक आहे.
त्याचे कारण म्हणजे चार राज्यांमध्ये एनडीएला खातेही उघडता येणार नसल्याचा दावा करण्यात आला आहे. इंडिया टीव्ही आणि सीएनएक्स यांनी हे भाकित केले आहे. पंजाब, मणिपूर, केरळ आणि आंध्र प्रदेश ही ती राज्ये आहेत. केरळमध्ये लोकसभेच्या 20 जागा आहेत. मात्र या राज्यात एनडीएला एकही जागा मिळणार नाही. विरोधकांची आघाडी असलेल्या इंडिया आघाडीचे सर्व उमेदवार येथे विजयी होतील असे सांगितले जाते आहे. आंध्र प्रदेशातूनही 25 खासदार लोकसभेवर निवडून जातात. येथेही एनडीएला अपयशाचा सामना करावा लागणार आहे. पंजाबच्या 13 जागांपैकी एकही जागा एनडीए जिंकू शकत नाही असे आजचे चित्र असल्याचे हा कौल सांगतो. याउलट इंडियाला केरळ आणि पंजाबमध्ये चांगली संधी आहे.
या दोन्ही राज्यांतील सगळ्याच जागा ही आघाडी जिंकणार आहे. मणिपूरच्या दोन जागाही इंडिया जिंकणार असल्याचे भाकित आहे. मात्र आंध्र प्रदेशमध्ये या आघाडीलाही यश मिळणार नाही. या राज्यात एनडीए आणि इंडिया या दोघांपेक्षा प्रादेशिक पक्ष वरचढ ठरतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. पक्षाने या राज्यातील सत्ताही गमावली. मात्र लोकसभा निवडणुकीत भाजपला फारसा फटका बसत नसल्याचे स्पष्ट होते आहे. भाजपला गेल्या वेळेपेक्षा पाच जागा कमी मिळतील असे जनमता चाचणीतून समोर येते आहे. गेल्या वेळी भाजपला 28 पैकी 25 जागा येथे मिळाल्या होत्या. यंदा त्यांना 20 जागांवर समाधान मानावे लागणार आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम