मित्रमैत्रिणींकडून आर्थिक मदत होणार ; वाचा आजचे राशिभविष्य !

advt office
बातमी शेअर करा...

बातमीदार | २१ सप्टेंबर २०२३

मेष – शुभवार्ता ऐकायला मिळतील. जुन्या जागेचा प्रश्न निकालात निघेल. व्यवसायातील वातावरण चांगले राहील अचानक लाभ होण्याचे योग आहेत. वारसा हक्काची प्रकरण मार्गी लागेल. व्यापारात आर्थिक उन्नती होईल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक बाबतीत मदत मिळेल. मनातील संभ्रम दुर करून आत्मविश्वासाने सामोरे जा.

वृषभ – समाजात आपली प्रतिष्ठा वाढल्याने आनंदी राहाल. नोकरीत बौद्धिक चातुर्याने आपण हाती घेतलेल्या कामात सफलता मिळवाल. उद्योग व्यापार तेजील राहील. अधिक प्रयत्न केल्यास जास्तीचे यश मिळू शकेल. कुंटुबातील वातावरण आनंददायी आणि सहकार्याचे वातावरण राहील.

मिथुन – आजचे निर्णय महत्वपूर्ण ठरतील. समाजात केलेल्या कार्याची स्तुती होईल. महत्वपूर्ण व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. कौटुंबिक सौख्य राहील. आरोग्य उत्तम राहणार आहे. परदेश प्रवास होईल.

कर्क – नोकरीत वारिष्ठांकडून त्रास जाणवेल. नोकरीत विरोधकांच्या कारवायांना बळी पडणार नाही, याची विशेष काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवून वाटचाल करावी. अतिरिक्त ताणतणाव वाढणार आहे. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. व्यसनापासून दूर राहा. महिलांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

सिंह- आनंदाची व समाधानाची बातमी ऐकायला मिळेल. नव्या संधी मिळतील. घरात मंगलकार्य धार्मिक कार्य घडतील. विद्यार्थ्यांच्या विद्याभ्यासात प्रगती होईल. संततीबद्दल समाधान व्यक्त कराल. आज केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे.

तूळ – धार्मिक अध्यात्मिक प्रसंगातून आत्मविश्वास मिळवू शकाल. व्यापारिक प्रकरणात जवाबदारी वाढणार आहे. आपसातील वाद समजदारीने मिटवा. वैवाहिक व कौटुंबिक जीवनात आनंदी राहाल.आध्यात्मिक कार्य घडतील. देवधर्म तीर्थक्षेत्री यात्रा घडु शकतात.

कन्या – पती पत्नीत स्नेह निर्माण होईल. महिला वर्गाकडून विशेष सहकार्य लाभेल. दूरवरचे प्रवास हितकारक ठरतील. आपल्या आवडीच्या गोष्टीसाठी वेळ मिळेल. आनंद प्राप्त होईल. दिनमान उत्तम असल्याने अपेक्षेप्रमाणे लाभ होईल. नोकरी शासकीय कामे राजकीय क्षेत्रातील व्यक्तीना आज अनुकुलता लाभेल.

वृश्चिक – आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. हानीकारण दिनमान आहे. लेखी कागदपत्राशिवाय मोठे व्यवहार टाळावेत. शक्यतो प्रवास टाळावेत. वाहने सावकाश चालवा.अपघात भय संभवते. शारिरिक व्याधीकडे दुर्लक्ष करू नये.

धनु – व्यापारात थोड्याफार अडचणी निर्माण होतील. हाती कमी पैसा असल्याने योजना अपूर्ण राहाण्याची शक्यता आहे. वास्तविकतेला महत्व देणे गरजेचे आहे. कुटुंबातून सहकार्य लाभेल.

मकर – ताणतणाव वाढेल. हातून चुकीचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. नोकरीत बदलाचे निर्णय घेऊ नयेत. वरिष्ठांकडून कामाचा दबाव राहील. मनमुटाव होण्याची शक्यता आहे. कायदेशीर पेचप्रसंगात अडकले जाण्याची शक्यता आहे. कायदेशीर व्यवहार करा.

कुंभ – नोकरीत रोजगारात प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करणार आहे. विद्यार्थ्याची विद्याभासात प्रगती होईल. प्रवासातून आज लाभ होणार आहे. साहित्य कला क्षेत्रातील मंडळीना फारच चांगला फलदायी दिवस आहे.

मीन – नोकरीत कर्तुत्वाला चांगली संधी निर्माण होईल.मोठ्या भांवडाकडून उत्तम सहकार्य लाभेल. अचानक लाभ होतील. कौटुंबिक वातावरण चांगले व आनंददायी राहील. भाषाभ्यास ग्रंथलिखाणास उत्तम दिवस आहे. विद्याभ्यासात प्रगती राहील.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम