हे बॉलीवूड स्टार किड्स करतील २०२३ मध्ये पदार्पण

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २५ ऑक्टोबर २०२२ । एखादा कलाकार जर फिल्मी कुटुंबातून आला असेल तर त्याच्या चित्रपटांवरही बॉयकॉट करण्याची मोहिम राबवली गेली आहे. यावर्षीचं वर्ष बॉलिवूडसाठी बॉयकॉट वर्ष म्हणूनच गेलं आहे. मात्र, तरीही येत्या 2023 ला अनेक स्टारकिड्स बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

२०२२ हे वर्ष काही बॉलिवूडसाठी फार फलदायी ठरलेलं वर्ष नाहीये. कारण, यावर्षी आलेले बऱ्यापैकी सगळेच बॉलिवूड चित्रपट हे सुमार कामगिरी करणारे ठरले आहेत. त्याला काही अपवाद निश्चितच आहेत. मात्र, एकही बॉलिवूड चित्रपट दैदिप्यमान अशी कामगिरी करणारा ठरला नाहीये.

त्या तुलनेत साऊथच्या चित्रपटांना मिळालेला प्रतिसाद वाखाणण्याजोगा आहे. साऊथच्या अनेक चित्रपटांनी आपली प्रादेशिक मर्यादा ओलांडून देशपातळीवर चमत्कारीक अशी कामगिरी केली आहे. दुसरीकडे, बॉलिवूडवर नेपोटीझमचाही आरोप सातत्याने होतोच आहे. त्यामुळेही, बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांना रोषाचा सामना करावा लागला आहे. अगस्त्य नंदा, सुहाना खान,आर्यन खान,खुशी कपूर,इब्राहिम अली खान,जुनैद खान,अहान पांडे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम