अभिनेता अभिषेक बच्चन पुन्हा ट्रोल !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २५ ऑक्टोबर २०२२ । वडिलामुळे नेहमी ट्रोल होणारा अभिनेता म्हणजे अभिषेक बच्चन हा असाच एक स्टार आहे.बॉलिवूडचे सर्वोत्कृष्ट अभिनेते अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक याला अनेकदा त्याच्या अभिनयासाठी ट्रोलिंगला सामोरे जावे लागते, परंतु तो प्रत्येक वेळी त्याच्या ट्रोल्सला चोख प्रत्युत्तर देतो.

त्याने पुन्हा एकदा ट्रोल क्लास सुरू केला आहे. त्याने एका ट्रोलला दिलेल्या चोख उत्तरामुळे चाहते अभिषेकच्या बुद्धीचे कौतुक करत आहेत. वास्तविक अभिषेकने एका पत्रकाराच्या ट्विटला उत्तर देताना विचारले होते की, आजच्या युगातही लोक वर्तमानपत्र वाचतात का?

 

 

अभिषेकच्या या कमेंटवर एका ट्रोलने लिहिलं की, बुद्धिमान लोक अजूनही वाचतात पण तुमच्यासारखे बेरोजगार लोक वाचत नाहीत. यानंतर अभिषेकनेही या ट्रोलला चोख प्रत्युत्तर दिले आणि लिहिले की, ओह वेल. तुमच्या इनपुटबद्दल धन्यवाद. मात्र, मी तुम्हाला सांगतो की बुद्धिमत्ता आणि रोजगार यांचा एकमेकांशी संबंध नसतो.त्याने पुढे लिहिले की, जसं की तुझंच उदाहरण घे… मला आशा आहे की तुमच्याकडे नोकरी असेल पण तू हुशार नाही आहेस, हे तुझ्या ट्विटमुळे मला पटलं आहे.अभिषेकच्या या उत्तरानंतर अनेक चाहत्यांनी त्याचे कौतुक करणारे ट्विट केले. एका व्यक्तीने सांगितले की, तुम्ही ट्रोलला गांभीर्याने घेत नाही, त्यांना इतरांवर टीका करण्यातच आनंद मिळतो. मला तुमची स्क्रीन प्रेझेन्स आवडते. आशा आहे की तुम्ही चांगले काम करत राहाल.लक्षात घेण्यासारखी बाब ही आहे की अभिषेक काही काळापूर्वी दसवी या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत निम्रत कौर आणि यामी गौतम सारख्या स्टार्स दिसल्या होत्या. याशिवाय त्याने ओटीटीवरही पदार्पण केले आहे आणि ब्रीद: इनटू द शॅडोज मुळे तो चर्चेत राहिला आहे. सध्या तो या वेबसीरिजच्या तिसऱ्या सीझनचं शूटिंग करत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम