‘या’ गुंतवणुकदारांना आज मिळाला मोठा परतावा !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २१ ऑगस्ट २०२३ | देशभरातील अनेक लोक शेअर बाजारात मोठी गुंतवणूक करीत असतात. मुंबईतील गेल्या ९० वर्षे जुनी इन्व्हेस्टमेंट कंपनी इंडस्ट्रियल अँड प्रुडेंशियल इन्व्हेस्टमेंटच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना दमदार परतावा दिला आहे.

शेअर्समधील तेजी शिवाय डिव्हिडेंड देत त्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना सोबत ठेवले आहे. सध्या हा शेअर 2,860.85 रुपयांवर ट्रेड करत आहे. कंपनीवर कोणतेही कर्ज नाही, ही मोठी जमेची बाजू आहे. 24 सप्टेंबर 2002 रोजी हे शेअर्स केवळ 25 रुपयांवर होते. आता ते 2860.85 रुपयांवर आहेत, म्हणजेच 21 वर्षात 1 लाखाचे 1.14 कोटी झाले. त्यांनी केवळ लाँग टर्मच नाही शॉर्ट टर्ममध्येही चांगला परतावा दिला आहे.

21 मार्च 2023 रोजी तो 1505.80 रुपयांवर होता. यानंतर शेअर्सची खरेदी वाढली आणि अवघ्या पाच महिन्यांत 14 ऑगस्ट 2023 रोजी तो 96 टक्क्यांनी 2,947.95 रुपयांवर गेला, जो याचा उच्चांक आहे, पण सध्या हा शेअर 3 टक्क्यांच्या सुटीवर मिळत आहे. इंडस्ट्रियल आणि प्रुडेन्शियल इन्व्हेस्टमेंटने शेअर्सच्या झपाट्याने वाढीमुळे गुंतवणूकदारांना कोट्यधीश तर बनवले आहेच, पण डिव्हिडंडनेही त्यांना चांगली कमाई केली आहे. 2003 पासून, ते दरवर्षी गुंतवणूकदारांना डिव्हिडेंड देतात. 2019, 2020 आणि 2021 मध्ये गेल्या पाच वर्षांच्या बाबतीत बोलायचे झाले तर 25-25 रुपये प्रति शेअर डिव्हिडेंड दिला आहे. त्यानंतर 2022 मध्ये प्रति शेअर 50 रुपये डिव्हिडेंड दिला आणि आता या वर्षी 60 रुपये डिव्हिडेंड देणार आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम