क्रूर बापाने केली पाच वर्षीय चिमुकलीची हत्या !

advt office
बातमी शेअर करा...

बातमीदार | २१ ऑगस्ट २०२३ | यावल तालुक्यातील फैजपूर नजीक न्हावी शिवारात पाच वर्षाच्या बालिकेच्या हत्येप्रकरणी फैजपूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिता ठुशा बारेला असे हत्या झालेल्या बालिकेचे नाव आहे. ठुशा भावला बारेला असे बालिकेची हत्या करणा-या बापाचे नाव आहे. 17 ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी 20 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कु. अनिता बारेला या बालिकेस दवाखान्यात घेवून जातो असे सांगून तिचा बाप ठुशा बारेला तिला घेवून गेला. बालिकेला दवाखान्यात न नेता त्याने न्हावी शिवारातील धिरज चौधरी यांच्या शेतातील विहीरीत फेकून जिवे ठार केले. बालिकेचे आजोबा छंडा वेरला बारेला यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फैजपूर पोलिस स्टेशनला ठुशा बारेला याच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स.पो.नि. निलेश वाघ पुढील तपास करत आहेत. आरोपीस अटक करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम