फ्रीजमधील ‘या’ वस्तू देतील मोठ्या रोगाला आमंत्रण !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ७ सप्टेंबर २०२३ | प्रत्येक घरात नेहमी ताज्या आणि गरमागरम पदार्थ खाण्याची सवय अनेकांना आहे. पण काही लोकं अशी ही आहेत जे फ्रीजमध्ये ठेवलेले शिळे अन्न खातात. आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे या सवयी बदलत आहेत. पण आरोग्यासाठी हे घातक ठरु शकतं. फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न नंतर गरम करुन खाणारी अनेक मंडळी आहेत. फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न वारंवार गरम करुन खाल्याने त्यातील पोषणतत्व नष्ट तर होतातच पण आजारांना पण निमंत्रण देतात. ज्यामुळे कर्करोगासारखा आजार ही होऊ शकतो.

निरोगी राहण्यासाठी संतुलित आहात खूप महत्त्वाचा असतो. सोबतच महत्त्वाचे असतो तो व्यायाम. पण आपण या छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. जो पुढे जावून मोठा आजारात रुपांतर होतो. फ्रिजमध्ये अन्न साठवल्याने त्याचे पोषणतत्व कमी होत जातात.

 

मांसाहार
तुम्ही फ्रिजमध्ये मांसाहार करत असाल तर नॉनव्हेज फूड कधीही फ्रीजमध्ये ठेवू नयेत. ते ताजेच खावे. असे पदार्थ साठवून ठेवल्याने यामुळे फूड पॉयझनिंग देखील होऊ शकते. या शिवाय अनेक आजार देखील होऊ शकतात.

भात
प्रत्येकाच्या ताटात भात हा असतोच. त्याशिवाय जेवण पूर्ण होत नाही. पण अनेक लोकं फ्रीजमध्ये ठेवलेला भात सकाळी गरम करुन खातात. हे आरोग्यासाठी चांगले नाही. शिळ्या भातामुळे विषबाधा होऊ शकते.

अंडी
अंडीपासून वेगवेगळ्या डीश बनवून आवडीने खाले जाते. ऑम्लेट असो किंवा त्याची भाजी. त्यामध्ये भरपूर पोषणतत्व असते. पण अंडी बनवल्यानंतर लगेच खाणे चांगले. फ्रीजमध्ये ठेवलेले अंडी नंतर गरम करुन खाणे आरोग्यासाठी चांगले नसते.

हिरव्या भाज्या
हिरव्या भाज्या आरोग्यासाठी वरदान आहेत. हिरव्या भाज्यांमध्ये नायट्रेट्स आढळतात. पण जेव्हा ते पुन्हा गरम केले जाते तेव्हा ते कार्सिनोजेनिक गुणधर्म सोडतात. ज्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका असतो.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम