
मुंबई विरुद्ध लखनऊ सामन्यात हे खेळाडू बजावणार कामगिरी !
दै. बातमीदार । २४ मे २०२३ । देशातील अनेक लोकांना आयपीएल पाहण्याचा मोह आवरला जात नाही त्यांच्यासाठी हि बातमी खास आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर त्याआधी 7 वाजता टॉस होईल. या सामन्यासाठी ड्रीम इलेव्हन कशी असावी, ड्रीम इलेव्हनमध्ये कॅप्टन कोणाला करायचा पिचनुसार बॉलर कोण घ्यायचे हे सर्व आपण माहित करुन घेऊयात.
एमए चिदंबरम पीच रिपोर्ट
एमए चिदंबरम स्टेडियममध्ये टॉस जिंकून पहिले फिल्डिंग करण्याकडे टीमचा कळ असतो. कारण ही खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे आधी टॉस जिंकून प्रतिस्पर्धी संघाला बॅटिंगसाठी भाग पाडायचा प्रयत्न हा टॉस जिंकणाऱ्या टीमचा असतो.
लखनऊ विरुद्ध मुंबई यांच्यातील हेड टु हेड आकडेवारी ही पलटणसाठी फार चिंताजनक आहे. लखनऊ विरुद्ध मुंबई यांच्यात एकूण या 16 व्या मोसमात एकदा आणि त्याआधी 2022 मध्ये दोनवेळा आमनासामना झाला आहे. या एकूण 3 सामन्यात लखनऊने मुंबईला लोळवलंय. स्ट्राँग बॅटिंग लाईनअप असणाऱ्या मुंबई इंडियन्सची लखनऊ विरुद्ध मात्र बॅटली लो होते. मुंबईला अजूनतरी लखनऊवर विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे मुंबईसमोर लखनऊचं आव्हान आहे.
दोन्ही संघांची संभावित प्लेइंग इलेव्हन
लखनऊ सुपर जायंट्स | कृणाल पंड्या (कॅप्टन), क्विंटन डीकॉक (विकेटकीपर), करण शर्मा, प्रेरक मंकड, मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन, आयुष बदोनी, कृष्णप्पा गौतम, नवीन-उल-हक, रवि बिश्नोई आणि मोहसिन खान.
मुंबई इंडियन्स | रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, क्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय आणि आकाश मधवाल.
ड्रीम इलेव्हन टीम
कॅप्टन – ईशान किशन
उप-कर्णधार – मार्कस स्टोयनिस.
विकेटकीपर – क्विंटन डी कॉक.
बॅट्समन – सूर्यकुमार यादव आणि निकोलस पूरन.
ऑलराउंडर – कॅमरुन ग्रीन आणि क्रुणाल पांड्या.
बॉलर- रवि बिश्नोई, पीयूष चावला, मोहसिन खान आणि जेसन बेहरेनडॉर्फ.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम