‘त्या’ गद्दारांना गाडून पुन्हा उभे राहणार ; राऊतांची घणाघाती टीका !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २२ जानेवारी २०२३ । राज्यातील शिंदे व ठाकरे गटातील सुरु असलेला वाद आणखी रंगत चाललेला आहे, शिंदे गटाकडून टीका झाली कि लागलीच ठाकरे गटाचे नेते त्यांना प्रतिउत्तर देत असतांना नेहमी दिसून येत आहे. उद्या बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. त्यापार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गटावर घणाघाती टीका केली आहे. ४० गद्दारांना गाडून पुन्हा उभे राहणार. तेव्हाच बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केल्याचे समाधान शिवसैनिकांना होईल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

आज सामनातील पहिल्या पानावर अर्धा पान जाहीरात देऊन संजय राऊतांनी बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करताना शिंदे गटावर निशाणा साधला आहे. या जाहीरातीत संजय राऊतांनी म्हटले आहे की, ‘साहेब मी गद्दार नाही. गेलेल्या 40 गद्दारांना गाडून पुन्हा त्याच उमेदीने उभे राहू तेव्हाच तुम्हाला खर्या अर्थाने अभिवादन केले याचे समाधान आमच्या सारख्या शिवसैनिकांना होईल.’
तसेच, बाळासाहेब ठाकरे यांच्या जंयतीनिमित्त उद्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, उद्या संध्याकाळी षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरे शिवसैनिक तसेच महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार आहेत. तसेच, उद्या शिवसेनेतर्फे राज्यात ठिकठिकाणी सामाजिक उपक्रमांचे आयोजनही करण्यात आल्याचे संजय राऊत म्हणाले.

पुढे संजय राऊत म्हणाले, उद्या विधानभवन परिसरात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकांचा हा राजकीय कार्यक्रम आहे, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली. मात्र, बाळासाहेब ठाकरेंचा सन्मान होत आहे. त्यामुळे आता यावर टीका करणे योग्य नाही, असे संजय राऊत म्हणाले. योगायोग म्हणजे उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुखपदाचा कार्यकाळही उद्याच संपुष्टात येत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंकडून मोठी घोषणा करण्यात येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. वंचित बहूजन आघाडीसोबत युतीची घोषणा उद्या उद्धव ठाकरे करतील, असे बोलले जात आहे. उद्या उद्धव ठाकरेच यावर आपली भूमिका स्पष्ट करतील, असे संजय राऊत यांनी सांगितले.

संजय राऊत जम्मू-काश्मिरात राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेत सहभागी झाले. त्यावरुन भाजपने संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले, अशा टीकाकारांकडे लक्ष देण्याची गरज नाही. असे लोक रोजच टपल्या, डिचल्या स्वत:लाच मारत असतात. राहुल गांधींची यात्रा ही राजकीय नाही. यात्रेमागील भावना समजून घेतली पाहीजे. देशातील द्वेषभावना नष्ट करण्यासाठी राहुल गांधी यात्रा करत आहेत. विरोधकांनी राहुल गांधींप्रमाणे 4500 किलोमीटर सोडा केवळ 450 किलोमीटर तरी चालून दाखवावे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम