हॉटेल भगवती परमिट रूम बिअर बार मधून चोरी करणारे चोरटे जेरबंद

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | 16 सप्टेंबर 2022 | अमळनेर शहरातील चोपडा रोडवरील हॉटेल भगवती परमीट रूम बिअर बारच्या लोखंडी खिडकीच्या सळई तोडुन आत प्रवेश करुन कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी एकुण ५४.२२५/- रु. कि. ऐवज त्यात रोख रुपये, सी.सी. टि. व्ही. डि. व्ही. आर. व विदेशी दारुच्या बाटल्या चोरुन नेल्याने दि.१३/०९/२०२२ रोजी अमळनेर पो.स्टे. गु.र.नं. ४४१ / २०२२ भा.द.वि. कलम ४६१.३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यांतील अज्ञात चोरट्यांनी हॉटेल मधील सी.सी.टि.व्ही. रेकॉर्डींगचा डि.व्ही. आर. देखील सोबत चोरून नेला असल्याने गुन्हा उघडकीस आणणेकामी काहीएक पुरावा उपलब्ध नव्हता.

नमुद गुन्ह्यांचा तपास सुरु असतांना पो नि. जयपाल हिरे यांनी तपास पथकातील सफी/पुरुषोत्तम पाटील, पोना/ मिलींद भामरे, पोना/ सूर्यकांत साळुंखे अश्यांना अश्याप्रकारच्या गुन्हे करणारे कार्यपद्धती असलेल्या गुन्हेगाराची माहीती संकलित करुन त्यांच्या कडुन गुन्हा उघडकीस आणणेकामी प्रयत्न करणेबाबत सुचना दिल्या होत्या त्यादृष्टीने गुन्ह्याचा तपास चालू असताना अमळनेर पो.स्टे. रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे- शांताराम उर्फ शान्या प्रताप कोळी रा. रुबजी नगर, अंमळनेर याचे कडेस गुन्ह्यांच्या अनुषंगाने तपास करणेस नमुद पथक गेले असता तो घरी मिळुन आला नाही. त्यावरुन पथकाचा त्याचा वरील संशय बळावल्याने त्याच्या ठाव ठिकाण्या बाबत माहीती घेतली असता तो माचले ता. चोपडा जि. जळगांव येथे असल्याचे माहीती प्राप्त झाली त्यावरुन पथकाने माचले ता. चोपडा जि. जळगांव येथुन रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे- शांताराम उर्फ शान्या प्रताप कोळी राबजी नगर, अमळनेर यांस ताब्यात घेवुन अमळनेर पो स्टे येथे आणले. त्यास पो. नि. जयपाल हिरे यांनी विश्वासात घेवुन विचारपुस करता त्याने त्याचा साथीदार नामे भुषण प्रमोद सनेर राहातेड बु. ता.चोपडा जि. जळगांव याच्या सहाय्याने जळोद ता. अमळनेर येथुन मोटर सायकल चोरी करुन तिच्याने अंमळनेर शहरात येवुन अमळनेर शहरातील चोपडा रोडवरील हॉटेल भगवती चोरी केली असल्याचे कबुली दिली असुन आरोपी नामे १) शांताराम उर्फ शान्या प्रताप कोळी रा. रुबजी नगर, अंमळनेर, २) भुषण प्रमोद सनेर राहातेड बु. ता. चोपडा जि. जळगांव अश्यांना गुन्ह्यांकामी अटक करण्यात आली आहे. त्यांच्या कडुन खालील प्रमाणे मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

१) ६४८०/- रु. कि. च्या रॉयल स्टॅग कंपनीच्या १८० एम. एल. मापाच्या विदेशी दारुच्या एकुण ३६ बाटल्या

२) ६७२०/- रु. कि. च्या ईम्पीरियल ब्लु. कंपनीच्या १८० एम.एल. मापाच्या विदेशी दारुच्या एकुण ४२ बाटल्या

३) १०,०८० /- रु. कि. च्या मॅकडॉल न. १ कंपनीच्या १८० एम.एल. मापाच्या विदेशी दारुच्या एकुण ६३ बाटल्या

४) २५,०००/- रु. कि.ची एक बजाज कंपनाची डिस्कव्हर मोटर सायकल तिचा क्र. एम.एच.१९ बी. आर. ८४१६

जु.वा.कि.अ.
एकुण ४८,२८०/- रुपयवर नमुद मोटर सायकल बाबत पोलीस स्टेशन कडील अभिलेख तपासला असता मोटर सायकल चोरी बाबत अमळनेर पो.स्टे. गु.र.न. ४४५/२०२२ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. डॉ. प्रविण मुंढे सो मा अपर पोलीस अधिक्षक श्री. रमेश चोपडे सो. मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री राकेश जाधव सो यांच्या सुचनेप्रमाणे व पो. नि. श्री. जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाने सफी / पुरुषोत्तम पाटील, पोना/मिलींद भामरे, पोना/ सूर्यकांत साळुंखे, यांनी बजावली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम