तुमच्या अनेक अडचणीवर हि सुपारी देवू शकते मात !
दै. बातमीदार । २५ एप्रिल २०२३ । हिंदू धर्मात ज्योतिष शास्त्राला महत्व प्राप्त आहे. त्यातील एक म्हणजे पूजेव्यतिरिक्त सुपारीशी संबंधित काही विशेष उपायही सांगण्यात आले आहेत. वेगवेगळ्या अडचणींवर सुपारीचा जालीम उपाय केला जातो. भोपाळचे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा त्यांच्याबद्दल सांगत आहेत. जाणून घेऊया सुपारीशी संबंधित काही खास उपाय.
– पैसा मिळवण्यासाठी
ज्योतिष शास्त्रानुसार पूजेत वापरण्यात येणारी सुपारी कापडासोबत बांधून पूजा संपल्यानंतर घरातील संपत्तीच्या ठिकाणी ठेवावी. असे केल्याने घरात सुख-समृद्धी येते असे मानले जाते. यासोबतच घराचे वैभव आणि संपत्तीही वाढते.
व्यवसाय किंवा नोकरीत यश मिळवण्यासाठी –
ज्योतिष शास्त्रात असे सांगितले आहे की, व्यवसाय किंवा नोकरीमध्ये यश मिळवण्यासाठी शनिवारी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाची पूजा करा आणि तेथे एक रुपयाचे नाणे आणि एक सुपारी ठेवा. दुसऱ्या दिवशी पिंपळाच्या झाडाचे एक पान घेऊन त्यात ती सुपारी व नाणे बांधून आपल्या संपत्तीच्या ठिकाणी ठेवावे. असे केल्याने तुम्हाला व्यवसाय आणि नोकरीमध्ये यश मिळेल.
– अडलेली कामं पूर्ण करण्यासाठी
तुमचे कोणतेही काम अडकले असेल तर त्यासाठी दोन लवंगा आणि एक सुपारी पर्समध्ये ठेवा. महत्त्वाचे काम करताना यातील लवंग तोंडात धरा आणि नंतर मंदिरात सुपारी अर्पण करा. असे केल्याने कामातील अडथळे दूर होऊन कामे लवकर पूर्ण होतील.
घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी –
जर एखाद्या व्यक्तीच्या घरात कौटुंबिक कलह असेल आणि घरातील सदस्यांमध्ये तणाव असेल तर अशा स्थितीत घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला चांदीच्या भांड्यात सुपारी ठेवा. लक्षात ठेवा की सुपारी अशा ठिकाणी ठेवावी, जिथे सूर्याची किरणे थेट त्यावर पडतील. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट होते, असे मानले जाते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम