‘हा’ देश लोकसंख्या वाढविण्यासाठी करतोय कोट्यावधी रुपये खर्च !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ११ जुलै २०२३ ।  जगातील अनेक देश लोकसंख्या कमी करण्यासाठी मोठे प्रयत्न करीत आहे तर देशांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये लोकसंख्या घटत चालल्याने चिंता वाढू लागली आहे. दक्षिण कोरिया सरकारनेही या विषयाची गंभीर दखल घेतली असून गेल्या काही वर्षांमध्ये लोकसंख्या वाढवण्याच्या विषयावर आत्तापर्यंत तब्बल 16 लाख कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

सध्या लोकसंख्येच्या गुणवत्तेचा विचार करता या देशात ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे म्हणूनच देशाची लोकसंख्या आणखी वाढावी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये दक्षिण कोरियातील चाइल्ड केअर सेंटर झपाट्याने बंद होत असून दुसरीकडे वृद्धांची काळजी घेणाऱ्या ओल्ड एज होम सेंटरमध्ये मात्र वाढ होत चालली आहे. 2017 पर्यंत दक्षिण कोरियात चाळीस हजार चाइल्ड केअर सेंटर होते आता ती संख्या 30000 पर्यंत कमी झाली आहे .दुसरीकडे ज्येष्ठांची काळजी घेणाऱ्या केंद्रांची संख्या 76 हजार होती ती आता 89 हजार पर्यंत वाढली आहे.

दक्षिण कोरियात गेल्या काही वर्षांमध्ये वृद्धांची संख्या वाढत चालली असून जगाच्या पाठीवर वृद्धांची संख्या वाढण्यामध्ये दक्षिण कोरिया एक क्रमांकाचा देश ठरला आहे. दक्षिण कोरिया मध्ये 65 वयापेक्षा जास्त वयोगट असलेले जे वृद्ध आहेत त्यांना काही प्रमाणात गरिबीचाही सामना करावा लागत आहे. सर्व सामान्य जीवन जगण्यासाठी जेवढ्या उत्पन्नाची गरज आहे त्याच्यापेक्षा निम्मेच उत्पन्न हे ज्येष्ठ नागरिक कमवू शकत आहेत.

साहजिकच या सर्व नागरिकांच्या कल्याणाची जबाबदारीही कोरिया सरकारला घ्यावी लागत आहे. वृद्ध नागरिकांची संख्या वाढत असताना जन्मदर मोठ्या प्रमाणावर घटल्याने कोरियातील अनेक शाळांमध्ये मुलांनी प्रवेश घेण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. साहजिकच गेल्या काही वर्षांमध्ये अनेक प्राथमिक शाळा आणि नर्सरी बंद पडल्या आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करूनच कोरिया सरकारने एक नियोजनबद्ध कार्यक्रम तयार केला असून आगामी कालावधीमध्ये देशाची लोकसंख्या वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जाणार आहेत. आत्तापर्यंत या विषयावर 16 लाख कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. आगामी कालावधीमध्ये यापेक्षाही जास्त खर्च करून देशाच्या लोकसंख्येची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम