हि तर तुम्हाला बाळासाहेबांनी दिलेली शिक्षा : भाजपचे उपाध्येचे ट्विट व्हायरल

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १० ऑक्टोबर २०२२ । कॉंग्रेससोबत जाऊन तुम्ही बाळासाहेबांचा अपमान केला, म्हणून त्यांच्या इच्छेमुळेच तुमचे दुकान बंद होत आहे, म्हणून जे काही घडत आहे, त्याला तुम्हीच जबाबदार आहात, असा टोला उपाध्ये यांनी ठाकरेंना लगावला आहे. आजही बाळासाहेबांचे शिवसेनेवर लक्ष आहे. त्या दिवशी त्यांच्या स्मृतीस्थळावरची ज्योत थरथरली तेव्हाच हे स्पष्ट झाले असे तुम्ही मानत असाल, तर शिवसेनेची वाताहत ही बाळासाहेबांनी तुम्हाला दिलेली शिक्षा आहे, असे समजा, असे ट्विट करून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

केशव उपाध्ये यांनी ट्विट करत म्हटले की, “उद्धवसाहेब, गेल्या २१ जूनला किशोरी पेडणेकरांना अश्रू अनावर झाले होते. बाळासाहेबांचे अजूनही लक्ष आहे यावर किशोरीताईंचा विश्वास होता. तुमचाही नक्कीच असेल. म्हणूनच, बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या पक्षाची वाताहत झाल्याचे खापर इतरांवर फोडू नका. ही तुमच्याच कर्माची फळे आहेत. तुम्ही सत्तेसाठी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा वाघ कॉंग्रेसच्या दावणीला बांधला. राष्ट्रवादीपुढे गुडघे टेकले. बाळासाहेबांना कधीच मान्य नसलेली सत्तेची पदे स्वतःकडे घेतलीत आणि हिंदुत्वाला लाज वाटणाऱ्या पालघर साधू हत्याकांडावर मौन पाळले. कॉंग्रेसकडून होणारा सावरकरांचा अपमान निमूटपणे सहन केलात, सत्तेच्या कैफात स्वाभिमानी आणि निष्ठावंत शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडून दहशतवाद्यांशी साटेलोटे असलेल्या नवाबाच्या मांडीला मांडी लावून बसलात.”

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम