वार करायचेच असतील तर समोरून करा ; आदित्य ठाकरे आक्रमक 

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १० ऑक्टोबर २०२२ ।  वरळी कोळीवाडा या आपल्या मतदारसंघात आदित्य ठाकरे आज नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहे. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले की,वार करायचे असतील तर समोरून करा. असे भेकडासारखे पाठिमागून खंजीर खुपसू नका अशी टीका यावेळी ठाकरे यांनी केली.

राज्यातील सध्याचे मिंधे गटाचे सरकार हे घटनाबाह्य आहे. मिंधे गटामुळे निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव व पक्षचिन्हही गोठवले. यावर मला मिंधे गटाला एकच सांगायचे आहे की, वार करायचे असतील तर समोरून करा. हिम्मत असेल तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा. निवडणुकीतून जनता कोणासोबत आहे हे कळेल.

आदित्य ठाकरे म्हणाले, असे घाणेरडे राजकारण कधीही पाहिले नाही. शिंदे गटाकडून नीच पद्धतीचे राजकारण केले जात आहे. राज्यातील सर्व जनता हे पाहत आहे. जनता शिवसेनेसोबतच आहेत. केवळ सत्तेसाठी, खुर्चीसाठी मिंधे गटाने स्वत:ला विकले आहे. मात्र, आता कोणत्याही स्थितीत लढायच आणि जिंकायच, असा आमचा निर्धार आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, स्वत:ला विकल्यानंतर मिंधे गटात राक्षसी महत्त्वकांक्षा निर्माण झाली आहे. ज्या शिवसेनेने, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी व पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी 40 गद्दारांना ओळख दिली, तिकिटे दिली, समाजात मानसन्मान मिळवून दिला, त्या शिवसेनेलाच संपवून टाकण्याचा कट आता गद्दार रचत आहेत. गेल्या अडीच वर्षांपासून हे प्रयत्न सुरू होते. गद्दार नैतिकता विसरुन आता दुसऱ्यांच्या शेजारी जाऊन बसले आहेत.आदित्य ठाकरे म्हणाले, उद्धव ठाकरे आता हुकुमशाहीविरोधात लढत आहेत. त्यामुळे हा लढा आता देशाचा झाला आहे. सर्व जनतेला सोबत घेऊन आम्ही हा लढा जिंकू.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम