त्वचेची चमक कमी होण्याचे हे आहे कारण !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २३ जानेवारी २०२३ । हिवाळा असो उन्हाळा असो आपण नेहमीच आपल्या आरोग्यासोबत त्वेचीची काळजी नेहमी घेत असतो तसेच त्यावरील चमक टिकवण्यासाठी आपण अनेक प्रकारची सौंदर्य उत्पादने वापरतो. त्वचा मुलायम ठेवण्यासाठी विविध प्रकारचे फेस वॉश देखील वापरले जातात. पण काही लोक त्यांच्या चेहऱ्यासाठी फक्त साबण वापरतात. पण चेहऱ्यावर साबण लावण्याचे अनेक तोटे आहेत. साबणामध्ये कॉस्टिक सोडा आणि कृत्रिम सुगंध असतो, ज्यामुळे त्वचेला हानी पोहोचू शकते. आपल्या चेहऱ्याची त्वचा शरीराच्या इतर भागांपेक्षा जास्त संवेदनशील असते. ज्यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. साबण लावल्याने त्वचेचे काय नुकसान होते ते जाणून घेऊया…

त्वचा कोरडी होते
साबणाने चेहरा धुतल्यास स्किन कोरडी होऊ लागते. साबणामध्ये सर्फेक्टंट असते, ज्यामुळे चेहऱ्याच्या त्वचेचे नुकसान होऊ शकते. चेहऱ्यासाठी साबणाचा अतिवापर केल्यास त्वचेवर सुरकुत्या येणे, लालसरपणा आणि जळजळ होणे अशा समस्या उद्भवू शकतात. साबण आपल्या त्वचेची नैसर्गिक ओलावा देखील खराब होऊ शकतो.

वृद्धत्वाची चिन्हे दिसू शकतात
जर तुम्ही तुमचा चेहरा साबणाने धुतलात तर तुमच्या चेहऱ्यावर वयाच्या आधीच वृद्धत्वाची लक्षणे दिसू शकतात. वारंवार साबणाने चेहरा धुतल्याने त्वचा कोरडी आणि निर्जीव होते. याशिवाय चेहऱ्यावर सुरकुत्या, बारीक रेषाही दिसू शकतात. साबण तुमच्या त्वचेतील नैसर्गिक तेल काढून टाकतो. चेहरा रोज साबणाने धुतल्याने त्वचा घट्ट आणि कोरडी होते. त्वचेवर नैसर्गिक तेल टिकवून ठेवायचे असेल तर चेहऱ्यावर जास्त साबण लावणे हानिकारक ठरू शकते.

त्वचेच्या पीएच पातळीवर होतो परिणाम
आपली त्वचा ही ॲसिडिक (आम्लयुक्त) असते आणि साबण अल्कलाईनवर आधारित असतो. अशा परिस्थितीत चेहरा साबणाने धुतल्याने त्वचेची पीएच पातळी खराब होऊ शकते. त्वचा निरोगी ठेवायची असेल तर पीएच लेव्हल बॅलन्स करणेही आवश्यक आहे. पीएच संतुलनामुळे, त्वचेला होणारा क्टेरियाचा संसर्ग देखील टाळता येतो.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम