
समाजातील शेवटच्या घटकाचा ही विकास झाला पाहिजे : राष्ट्रिय कार्याध्यक्ष भानुदास विसावे
प्रतिनिधी/भडगाव
सत्य शोधणारा युवा समाज घडवायचा आहे महापुरुषणी दिलेली शिक्षा सर्वांगीण समाज घटकांनी अंगीकारत कष्टकरी चर्मकार समाजाच्या शेवटच्या घटकातील समाज बांधवांचा विकास साधला पाहिजे तसेच समाजातील युवकांनी स्पर्धा परीक्षात सहभागी झाले पाहिजे शिक्षण, व्यवसाय, समाजकार्यात अग्रेसर राहून समाजाचा विकास साधयाला हवा असे मत चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे यांनी व्यक्त केले
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे वर्धापन दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळं वाटप तसेच कोरोना योधाचा सन्मान कार्यक्रम चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे, राज्यउपाध्यक्ष पांडुरंग बाविस्कर, जिल्हा अध्यक्ष उत्तम मोरे, वैद्यकीय अधिकारी साहेबराव आहिरे, नगरसेविका योजनताई पाटील, नगरसेविका कमलाबाई आहिरे यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाला.
यावेळी तालुका अध्यक्ष रवी आहिरे, उपाध्यक्ष मधुकर वाघ, युवा अध्यक्ष सुधीर आहिरे, संघटक दगडू गायकवाड, देवा आहिरे, राजेंद्र आहिरे, रावसाहेब आहिरे, महिला आघाडी अध्यक्ष लताताई आहिरे, उपाध्यक्ष सुरेखा वाघ, सचिव सरला आहिरे सह समाज बांधव उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी आहिरे यांनी केले तर आभार डॉ. मराठे यांनी मानले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम