आजचे राशीभविष्य, रविवार २५ सप्टेंबर २०२२

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | २५ सप्टेंबर २०२२ | मेष – आर्थिक स्थिती उत्तम राहील. इतरांचे गैरसमज दूर करावे लागतील. जुन्या मित्रमंडळींच्या भेटीचा योग. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

BJP add

वृषभ – मनाची द्विधावस्था टाळावी. एकाच गोष्टीवर ठाम राहावे. मनातील नसती शंका काढून टाकावी.

मिथुन – लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. चारचौघात प्रतिष्ठा कमवाल. सावधगिरी बाळगून व्यवहार करावा.

कर्क – आवडते पदार्थ चाखाल. परिश्रमाचे चीज होईल. मुलांबद्दलचा विश्वास दृढ होईल. आवडीच्या वस्तु खरेदी कराल.

सिंह – गुंतवणूक विचारपूर्वक करावी. संमिश्र घटना जाणवतील. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल.

कन्या – तुमच्या कलेचे कौतुक केले जाईल. क्षुल्लक कारणाने नाराज होऊ नका. निर्भीडपणे कामे पूर्ण कराल.

तूळ – मानसिक आरोग्य जपावे. ग्रहमानाची साथ लाभेल. आपले विचार ठामपणे मांडाल. गोड बोलून कार्यभाग साधाल.

वृश्चिक – फसव्या लोकांपासून सावध राहावे. मेहनतीच्या जोरावर कामे कराल. प्रयत्न अपेक्षेप्रमाणे साथ देतील.

धनू – अतिगोड पदार्थ खाणे टाळावे. तुमच्या अनुभवाचा फायदा होईल. भाग्याची उत्तम साथ मिळेल.

मकर – घरासाठी खरेदी केली जाईल. चिकाटीने कामे करावीत. मौल्यवान वस्तु लाभतील. अनावश्यक खर्च संभवतात.

कुंभ – बौद्धिक कामात लक्ष घालाल. तिखट शब्द टाळावेत. खर्च मर्यादित ठेवावा.

मीन – धडाडीने कामे पूर्ण कराल. रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. तुमचे मनोबल वाढीस लागेल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम